मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन एस पाटील याला अटक केली होती. तर, शिल्पकार जयदीप आपटे याला अटक करण्यात आली होती. यानंतर या प्रकरणात आता नव्याने माहिती समोर आली आहे. महाराजांच्या पुतळ्याचे वेल्डिंग करणाऱ्याला मालवण पोलिसांनी अटक केली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.
राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे वेल्डिंगचे काम करणाऱ्या परमेश्वर यादव (रा. उत्तर प्रदेश) याला मालवण पोलिसांनी अटक केली. यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ‘सकाळ’ने यासंदर्भात माहिती दिली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पुतळ्याचा ठेकेदार शिल्पकार जयदीप आपटे, कन्सल्टंट डॉ. चेतन पाटील यांना अटक केली होती. चेतन पाटील याला पोलिसांनी कोल्हापूरमधून अटक केली होती. जयदीप आपटे याला ठाण्यातून अटक करण्यात आली होती. आता याच प्रकरणात पुतळ्याचे वेल्डिंगचे काम करणाऱ्या परमेश्वर यादव याला मालवण पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता १९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा:
हमासचा म्होरक्या सिनवरच्या खोपडीचा इस्रायलने घेतला वेध
राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची हत्या एसआरएच्या वादातूनच ?
सिद्धरामय्यांनी आता राजीनामा द्यावा
बहराइच हत्येतील आरोपी सर्फराज, तालिबला पायावर मारल्या गोळ्या
नौदल दिनाच्या निमित्ताने राजकोट येथे शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा उभारला होता. पुतळ्याचे अनावरण ४ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. हा पुतळा २६ ऑगस्टला कोसळला. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी देखील मागितली होती.