सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याला अटक करण्यात आली होती. जयदीप आपटे हा न्यायालयीन कोठडीत होता. यानंतर जयदीप आपटे याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. २४ सप्टेंबर पर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन पाटील याला अटक केली होती. सिंधुदुर्ग पोलिसांनी ही कारवाई करत चेतन पाटील याला कोल्हापूरमधून ताब्यात घेतले होते. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे यालाही पोलिसांनी कल्याण येथून अटक केली होती.
मालवण राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला होता. त्यानंतर या प्रकरणात बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील आणि कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीचा मालक जयदीप आपटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. चेतन पाटीलकडे पुतळ्याचा चबुतरा बांधण्याची जबाबदारी होती. त्याला अटक करण्यात आली. पुतळा पडल्याची माहिती समोर येताच जयदीप आणि त्याच्या पत्नीने कल्याण येथील घराला कुलूप लावून घर सोडले होते. त्यानंतर काही दिवसांनी जयदीप आपटेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.
हे ही वाचा:
सरकारी फाईल्सवर सही करायची नाही! केजरीवालांना न्यायालयाचे आदेश
अरविंद केजरीवाल जामीनावर येणार तुरुंगातून बाहेर
ओडिशा सरकाराचा निर्णय; युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये अग्नीवीरांसाठी १० टक्के आरक्षण
पंतप्रधान मोदींची कझानमध्ये वाट बघतोय… पुतीन यांच्याकडून ब्रिक्स परिषदेसाठी विशेष निमंत्रण
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांपूर्वी राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला होता. नौदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी देखील मागितली आहे.