राजस्थान उच्च न्यायालयाने कन्हैय्यालाल खूनप्रकरणातील आरोपी मोहम्मद जावेद याला जामीन दिला आहे. भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पाठिंबा देत केलेल्या एका पोस्टमुळे कन्हैय्यालालचा गळा रियाझ अत्तारी आणि मोहम्मद गौस यांनी चिरला होता.
न्यायाधीश पंकज भंडारी आणि न्या. प्रवीण भटनागर यांनी २ लाखांचा जातमुचलका आणि १ लाखांच्या हमीच्या बदल्यात हा जामीन मंजूर केला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने २२ जुलै २०२२मध्ये मोहम्मद जावेद याला उदयपूर येथून अटक केली होती.
जावेदने या कटकारस्थानात मुख्य खुनी रियाझ अत्तारीला माहिती पुरवली. कन्हैय्यालाल हा त्याच्या टेलरिंगच्या दुकानात असल्याची माहिती जावेदने रियाझला दिली. तिथेच कन्हैय्यालालची गळा चिरून हत्या करण्यात आली.
हे ही वाचा:
बेकायदेशीर मशिदीचा प्रश्न विचारला म्हणून काँग्रेसच्या आमदारावर सहकारी आमदार भडकले!
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे वितरण
मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळून चार कामगारांचा मृत्यू
कोलकाता बलात्कार प्रकरण: प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांकडून पैशांची ऑफर
कन्हैय्यालालची २९ जून २०२२मध्ये ही हत्या करण्यात आली. रियाझ आणि मोहम्मद गौस यांनी ही हत्या घडवून आणली. ग्राहकाच्या रूपात हे दोघेही कन्हैय्यालालच्या दुकानात शिरले. दोघांच्या कपड्यांसाठी मापे घेत असताना या दोघांपैकी एकाने कन्हैय्यालालवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याच्यावर २६ वार करण्यात आले. भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट कन्हैय्यालालने केली होती.
कन्हैय्यालालला यासंदर्भात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला धमक्यांचे फोन येत होते. त्यानंतर कन्हैय्यालालने काँग्रेस सरकारकडे सुरक्षेची मागणी केली होती. पण पोलिसांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही.