७० किलो वजनाचे सिमेंटचे ब्लॉक टाकून मालगाडी उलटवण्याचा कट !

पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल, तपास सुरु

७० किलो वजनाचे सिमेंटचे ब्लॉक टाकून मालगाडी उलटवण्याचा कट !

उत्तर प्रदेशातील कानपूरनंतर आता राजस्थानमध्येही मालगाडी उलटवण्याचा कट रचल्याची घटना समोर आली आहे. अजमेरच्या सरधना येथे रेल्वे रुळावर सिमेंटचे दोन ब्लॉक टाकून मालगाडी रुळावरून उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. याबाबत पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (८ सप्टेंबर) काही अज्ञात लोकांनी अजमेरच्या मांगलियावास पोलीस स्टेशन परिसरातून जाणाऱ्या डीएफसीसीआयएल ट्रॅकवर (फुलेरा-अहमदाबाद मार्ग) दोन ठिकाणी सुमारे ७० किलो वजनाचे सिमेंटचे ब्लॉक टाकून ट्रेन रुळावरून उतरवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने सिमेंट ब्लॉक तोडून गाडी पुढे गेली आणि मोठी दुर्घटना घडली नाही. याप्रकरणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

हे ही वाचा : 

‘मुंबईच्या डबेवाल्या’ची कथा केरळच्या पाठ्यपुस्तकात !

चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाच्या गाडीची वाहनांना धडक; चालकाला अटक

इस्रायलकडून गाझामधील मानवतावादी क्षेत्रावर हवाई हल्ला; ४० जण ठार

प. बंगाल: भाजपा बूथ अध्यक्ष विजय भुईया हत्येप्रकरणी एनआयएकडून छापेमारी

यापूर्वी रविवारी कानपूरमधील अन्वर-कासगंज मार्गावर देखील अशीच एक घटना घडली होती. रेल्वे रुळावर घरगुती सिलेंडरची टाकी ठेवून कालिंदी एक्स्प्रेसला उलटवण्याचा प्रयत्न केला गेला होता. सुदैवाने सिलिंडरचा स्फोट घडला नाही, तसेच तपासादरम्यान घटनास्थळी सिलिंडरशिवाय पेट्रोलने भरलेली बाटली, माचिसच्या काड्या, मिठाईचा डबा आणि एक पिशवी आढळून आली होती. या घटनेचा दहशतवादी कटाच्या दृष्टी कोनातून पोलिसांकडून तपास केला जात आहे.

Exit mobile version