22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामामतदान अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या राजस्थानमधील उमेदवाराला अटक

मतदान अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या राजस्थानमधील उमेदवाराला अटक

दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्या ६० जणांच्याही आवळल्या मुसक्या

Google News Follow

Related

राजस्थानमधील टोंक जिल्ह्यातील देवरी- उनियाला विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांनी गावातील मतदान केंद्रावर उपविभागीय दंडाधिकाऱ्याला (एसडीएम) थप्पड मारल्याची घटना समोर आली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, पोलीस नरेश मीणा यांच्या अटकेच्या प्रयत्नात असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ निर्माण करत दगडफेक आणि जाळपोळ केली होती. या प्रकरणी पोलिसांनी ६० जणांना अटक केली. यानंतर नरेश मीणा यांनाही अटक करण्यात आली आहे.

एसडीएमला थप्पड मारल्यानंतर नरेश मीणा फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. बुधवारी रात्रीपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर आज पोलिसांनी त्यांना सामरावता गावातून अटक केली आहे. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हे ही वाचा  :

भास्कर जाधव म्हणाले, काँग्रेसचे सुनील केदार म्हणजे मारुतीच्या बेंबीतला विंचू!

मालेगाव व्होट जिहाद फंडिंग प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिराज मोहम्मद संबंधी ईडीकडून छापेमारी

ठाकरेंना अदानींचं खाजगी विमान चालतं, एरव्ही अदानी खटकतात!

एनआयएकडून गैर-स्थानिकांच्या हत्येमधील दहशतवाद्याची मालमत्ता जप्त

दरम्यान, टोंक जिल्ह्यातील देवली उनियारा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांना पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता काल रात्री सामरावता गावात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. काही आंदोलकांनी दगडफेक करत अनेक वाहने पेटवून दिली. अतिरिक्त फौजफाटा आल्यावरच परिस्थिती नियंत्रणात आणता आली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकाऱ्यांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. गोंधळ, दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणात आतापर्यंत ६० जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर राजस्थान प्रशासकीय सेवा (RAS) असोसिएशनच्या सदस्यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन नरेश मीणा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा