पश्चिम बंगाल पोलिसांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कोलकाता येथील निवासस्थानाची रेकी केल्याप्रकरणी मुंबईच्या माहीम परिसरातून राजाराम रेगे याला अटक करण्यात आली आह. पश्चिम बंगाल पोलिसांनी रविवारी रात्री माहीम पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केल्याची माहिती परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्त तेजस्वीनी सातपुते यांनी दिली आहे.
राजाराम रेगे याचे २६/११ मुंबई हल्ल्यात देखील नाव आले होते, २६/११च्या हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याला दादरच्या शिवसेना भवनात घेऊन जाणारा राजाराम रेगे होता अशी माहिती समोर येत आहे. राजाराम रेगे हा मुंबईच्या माहीम परिसरात राहण्यास असून रेगे हा १८ एप्रिल रोजी कोलकाता येथील तृणमूल काँग्रेसचे खासदाराच्या घर आणि कार्यालया बाहेर दिसला होता. याप्रकरणी अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयाकडून स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि नंतर एका पश्चिम बंगाल पोलिसाच्या पथकाने राजाराम रेगे याला रविवारी रात्री माहीम पोलिसांची मदत घेऊन रेगेला ताब्यात घेऊन कोलकत्ता येथे रवाना झाले. राजाराम रेगे याने पश्चिम बंगाल येथे मुंबई झालेल्या २६/११ सारखा हल्ल्याचा कट रचण्यात आला होता, असे कोलकत्ता पोलिसांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा:
वसुंधरा दिनानिमित्त ‘फॉर फ्युचर इंडिया’ चे कांदळवन स्वच्छता अभियान!
सिंगापूरनंतर हाँगकाँगने देखील एमडीएच आणि एवरेस्टच्या मसाल्यांवर घातली बंदी!
जेएनयूमधील ‘फुकट्यां’चा बंदोबस्त होणार!
‘मठ, मंदिरांच्या संपत्तीवर काँग्रेसची नजर’
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपींच्या संबंधांचा पश्चिम बंगाल पोलीस तपास करत आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेत्याच्या घराच्या आणि कार्यालयाच्या रेकीमागे दहशतवादी कृत्य करण्याचा त्यांचा हेतू आहे का याचा शोध कोलकत्ता पोलिसांचे विशेष पथक (एसटीएफ ) प्रयत्न करत आहे. ‘मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात कथितरित्या सहभागी असलेला राजाराम रेगे कोलकाता येथे दिसला होता. तो दक्षिण कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये थांबला होता. त्याने तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पीएचा फोन नंबर शोधून काढला आणि फोन करून सांगितले की मला त्यांना भेटायचे आहे अशी माहिती कोलकत्ता पोलिसांकडून देण्यात आली आहे.