प्रसिद्ध सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला सोमवारी रात्री उशिरा अश्लिल चित्रपटांच्या निर्मितीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. पॉर्नोग्राफिक फिल्म बनवून आणि काही ऍपवर ती पब्लिश केल्या ठपका व्यावसायिक राज कुंद्रावर ठेवण्यात आला आहे. यासंबंधी आपल्याकडे प्रबळ पुरावे असल्याचा दावा मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे. सध्या राज कुंद्राची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीतून अनेक नवनवे खुलासे होत आहेत. यानुसार, कदाचित आपल्यावर येणाऱ्या संकटाची चाहूल राज कुंद्रा यांना आधीच लागली होती. पुढच्या दिवसांत आपण भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर येऊ शकतो, याची कुणकुण लागल्यामुळेच राज कुंद्रानं ‘प्लान बी’ तयार केला होता.
तपासादरम्यान, क्राईम ब्रांचच्या हाती लागलेलं व्हॉट्सऍप्प चॅटवरुन राज कुंद्राच्या प्लान बीचा खुलासा होतो. तपासादरम्यान, राज कुंद्राच्या माजी पीए उमेश कामतच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली. त्यावेळी या मोबाईलमध्ये अनेक असे चॅट्स समोर आले आहेत. जे राज कुंद्राच्या प्लान बीचा खुलासा करतात.
एबीपी न्यूजच्या हाती लागलेल्या व्हॉट्सऍप्प चॅटनुसार, “एच अकाउंट्स” नावाच्या ग्रुपमध्ये प्रदीप बक्शीने हॉटशॉट ऍप्प नियमांची पूर्तता न केल्यामुळे गूगलनं सस्पेंड केलं असल्याची माहिती ग्रुपमध्ये टाकली होती. त्यानंतर राज कुंद्रानं रिप्लाय दिला की, “काहीच हरकत नाही. प्लान बी सुरु झाला आहे. जास्तीत जास्त २ ते ३ आठवड्यांत नवं ऍप्लिकेशन लाईव्ह होईल.”
हे ही वाचा:
६७% भारतीयांमध्ये कोरोना अँटीबॉडीज
मुंबईला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले, पुन्हा जागोगागी तुंबाई
ठाणे महानगरपालिकेची १५ लेडीज बारवर धाड
भारताच्या ‘सारंग’ ची होणार रशियात हवा
राज कुंद्राचा प्लान बी म्हणजे, बोलिफेम. हा प्लान राज कुंद्रानं तयार केला होता. पॉर्न इंडस्ट्रीला नव्या दिशेनं पुढे घेऊन जाण्यासाठी राज कुंद्रानं हा प्लान तयार केला होता. यादरम्यान, कामत आणि राज कुंद्रा या दोघांमधील आणखी एक चॅट समोर आलं, ज्यामध्ये राज कुंद्राने कामतला एक न्यूज आर्टिकल पाठवलं, या आर्टिकलमध्ये लिहिलं होतं की, “पॉर्न व्हिडीओ ७ ओटीटीवर प्रसारित केल्यामुळे पोलीस ७ ओटीटी मालकांना समन्स पाठवण्याची शक्यता आहे.”