मोबाईल ऍपद्वारे पोर्नोग्राफिक कंटेंटची निर्मिती आणि वितरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्या घरासह कार्यालयावर छापे टाकेल आहेत. याशिवाय या प्रकरणी आणखी काही ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे.
पोर्नोग्राफी प्रकरणाशी संबंधित मुंबई आणि उत्तर प्रदेशात १५ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये शिल्पा शेट्टीच्याही घरी ईडीने ही कारवाई केली आहे. मोबाईल ऍप्लिकेशन्सद्वारे पोर्नोग्राफिक सामग्रीचे उत्पादन आणि वितरणाच्या आरोपांबद्दल ही शोध मोहीम मनीलाँडरिंग तपासणीशी संबंधित आहे.
कथित पॉर्न प्रोडक्शनच्या संदर्भात २०२१ मध्ये कुंद्राविरुद्ध मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या खटल्यातून ईडीची चौकशी सुरू आहे. राज कुंद्रा याला यापूर्वी जुलै २०२१ मध्ये मुंबई गुन्हे शाखेने भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांतर्गत अटक केली होती, नंतर त्याला शहर न्यायालयातून जामीन मिळाला. अडल्ट कन्टेंट निर्मिती आणि अशा प्रकारच्या कन्टेंन्टचे मोबाईलच्या ऍपच्या माध्यमातून वितरण केल्याचा राज कुंद्रा याच्यावर आरोप आहे. याच खटल्यासंदर्भात त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे.
हे ही वाचा :
शेवटच्या काही तासांमध्ये मतदानाचा टक्का कसा वाढला? निवडणूक आयोगाने केले स्पष्ट
“बांगलादेशातील हिंदूंना मृत्यूला सामोरं जावं लागतंय”
जामा मशिद परिसरात शुक्रवारच्या नमाजापूर्वी रॅपिड ऍक्शन फोर्सची तुकडी तैनात
फडणवीस, शिंदे, अजित पवारांची अमित शहांशी चर्चा
प्रकरण काय?
मॉडेल्स आणि अभिनेत्यांना चित्रपटातील भूमिकांचे आमिष दाखवून अश्लील चित्रपटांमध्ये काम करण्यास भाग पाडले गेले. मुंबईत भाड्याने घेतलेल्या बंगल्यात किंवा अपार्टमेंटमध्ये शूटींग केले जात होते. शूटिंग दरम्यान, अभिनेत्रींना वेगळ्या स्क्रिप्टनुसार काम करण्यास सांगितले जायचे आणि न्यूड सीन करण्यासाठी दबाव आणायचे. ज्यांनी नकार दिला त्यांना धमक्या दिल्या गेल्या. रेकॉर्ड केलेल्या क्लिप नंतर सबस्क्रिप्शन-आधारित ऍप्सवर अपलोड केल्या गेल्या. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या रॅकेटमध्ये राज कुंद्राच्या कंपनीच्या मालकीच्या हॉटशॉट्स या ऍपचा सहभाग उघडकीस आणला.
जामीन याचिकेच्या सुनावणीदरम्यान, राज कुंद्राच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की प्लॅटफॉर्मवर कोणता मजकूर अपलोड केला गेला हे ठरवण्यासाठी राज कुंद्रा किंवा त्याचे आयटी प्रमुख रायन थॉर्प हे दोघेही जबाबदार नाहीत. मात्र, मुंबई पोलिसांनी कुंद्रा विरोधात पुरेसे पुरावे असल्याचे सांगितले होते.