कुंद्रा प्रकरणी आणखी एकाला अटक; व्हॉट्सअप चॅट उघड

कुंद्रा प्रकरणी आणखी एकाला अटक; व्हॉट्सअप चॅट उघड

अश्लिल चित्रपट बनविल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला अटक केल्यानंतर आता नेरूळ येथून आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. रायन जाँर्न थॉर्प असे या आरोपीचे नाव असून हा नेरूळचा रहिवासी आहे. मालवणी पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे.

गुन्हे शाखेकडे राज कुंद्रा विरोधात महत्वाचा पुरावा आढळला आहे. व्हॉटसअप चॅटिंग पोलिसांच्या हाती लागले असून त्यासंदर्भात आता चौकशी सुरू होईल. यातील महत्वाचा वॉन्टेड आरोपी प्रदीप बक्षीसोबत चॅटिंग केल्याचे आढळले आहे. एच अकाऊंट्स नावाने हा ग्रुप बनवण्यात आला होता. ज्यामध्ये सगळ्या व्यवहाराची माहिती देण्यात येत होती. आरोपी राज कुंद्रा याला मंगळवारी दुपारी १२ वाजता कोर्टात हजर करण्यात येणार होते. मुंबईच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने कुंद्राला न्यायालयात हजर करण्यात येणार होते. राज कुंद्रा याला अश्लिल (पॉर्न) चित्रपट बनवण्याप्रकरणात सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:
३२ जणांचा जीव जाऊनही महानगरपालिका २ वर्षांपासून सुस्त

भारताला ऑलिंपिकमध्ये २१ पदकांची अपेक्षा

मुलगा केंद्रीय मंत्री; पण आईवडील शेतात समाधानी

मुख्यमंत्री गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे

या व्हॉटसअप चॅटमध्ये या व्हीडिओची एकूण विक्रीचे आकडे, महसूल, झालेली नोंदणी याविषयी सविस्तर लिहिण्यात आलेले दिसते. त्यात एकूण विक्री २ लाख ६९ हजार झाल्याची माहिती प्रदीप बक्षीने दिली आहे. शिवाय महसुलापोटी २ लाख २३ हजार ३७५ रु. मिळाल्याचाही दावा करण्यात आला आहे. चित्रपटातून मिळणारा महसूल ४५ हजार ९३९ रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावर हा महसूल खूप खाली घसरल्याचे राज कुंद्राने म्हटल्याचेही दिसते आहे. त्यावर प्रदीप बक्षी म्हणतो की, प्रत्येक आठवड्यात आपण एकच चित्रपट टाकत असल्यामुळे विक्रीला गती मिळण्यासाठी वेळ लागेल. शिवाय, हा व्यवसाय कसा वाढविता येईल, यासंदर्भातही आडाखे या चॅटमध्ये बांधण्यात आले आहेत.

Exit mobile version