धक्कादायक! कुंद्रा विकणार होता पॉर्न व्हीडिओ ९ कोटींना

धक्कादायक! कुंद्रा विकणार होता पॉर्न व्हीडिओ ९ कोटींना

चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या पॉर्नोग्राफी प्रकरणात आता नवी माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हेअन्वेषण विभागाला मिळाली आहे.

त्यानुसार कुंद्राच्या मोबाईल, लॅपटॉप आणि हार्डडिस्कमध्ये तब्बल ११९ पॉर्न व्हीडिओ असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सगळे व्हीडिओ तो ९ कोटी रुपयांना विकणार होता, असे उघडकीस आले आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील फरार आरोपी यश ठाकूर उर्फ अरविंद श्रीवास्तव तसेच प्रदीप बक्षी यांच्यावर लुकआऊट नोटीस जारी केली आहे. हे राज कुंद्राचे सहकारी असल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा:

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे लष्करी अधिकाऱ्यांची कमतरता दूर होणार

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेमधून सरकारी महसुलाची कोटी कोटी उड्डाणे

संजय राऊतांनी ढापले ५५ लाख रुपये

‘वॅक्सीन मैत्री’ लवकरच पुन्हा सुरु

अश्लिल चित्रपट बनविल्याप्रकरणी राज कुंद्राला अटक केल्यानंतर रायन जाँर्न थॉर्प यालाही अटक करण्यात आली होती. गुन्हे शाखेकडे राज कुंद्रा विरोधात महत्वाचा पुरावा आढळला होता. व्हॉटसअप चॅटिंग पोलिसांच्या हाती होते. यातील महत्वाचा फरार आरोपी प्रदीप बक्षीसोबत कुंद्राने चॅटिंग केल्याचे आढळले होते. एच अकाऊंट्स नावाने हा ग्रुप बनवण्यात आला होता. ज्यामध्ये सगळ्या व्यवहाराची माहिती देण्यात येत होती.

या व्हॉटसअप चॅटमध्ये या व्हीडिओची एकूण विक्रीचे आकडे, महसूल, झालेली नोंदणी याविषयी सविस्तर लिहिण्यात आलेले होते. त्यात एकूण विक्री २ लाख ६९ हजार झाल्याची माहिती प्रदीप बक्षीने दिली होती. महसूल मात्र खूप खाली घसरल्याचे राज कुंद्राने म्हटल्याचेही या चॅटमध्ये दिसत होते. त्यावर प्रदीप बक्षीने म्हटले होते की, प्रत्येक आठवड्यात आपण एकच चित्रपट टाकत असल्यामुळे विक्रीला गती मिळण्यासाठी वेळ लागेल.

 

Exit mobile version