राज कुंद्रा याची मंगळवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर गुन्हे शाखेने त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने राज कुंद्रा याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. न्यायालयाने राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, कुंद्रा याच्या वकिलांनी राज कुंद्राला जामीन देण्यात यावा म्हणून न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असून त्याच्यावर उद्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.
दरम्यान, राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे, दोघींना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. २० सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे आदेश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. न्यायालयाने राज कुंद्राला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शर्लिन चोप्राला समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले होते.शर्लिनला आज (मंगळवारी) चौकशीसाठी हजर रहावे लागणार होते. वृत्तानुसार शर्लिनला सकाळी ११ वाजता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले होते. शर्लिन चोप्रा यांनी गेल्या काही दिवसांत राज कुंद्रा प्रकरणात अनेक खुलासे केले आहेत, तिने एका व्हिडीओद्वारे राज कुंद्राची एक कंपनी मॉडेल्ससाठी ऍप्स बनवते सोशल मीडियावर शेअर्स केलेल्या व्हिडीओत तीने म्हटले आहे.
हे ही वाचा:
शरद पवारांच्या वक्तव्यावर फडणवीस ‘हे’ बोलले
कर्जबुडव्या विजय मल्ल्या ठरला दिवाळखोर
कोकणासाठी पुढचे ५ दिवस धोक्याचे
एवढा ‘ज्यू द्वेष’ की ऑलिम्पिकचंही महत्व नाही
शर्लिन चोप्राला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स पाठवले होते, तिने सायबर सेलमध्ये आपला जबाब नुकताच नोंदविला असून, मी सायबर सेलला बोलावल्यानंतर मी पळून गेले नाही किंवा गायब झालेली नाही, मी माझा जबाब नोंदवला असून माझ्या जबाबाची माहिती मिळविण्यासाठी तुम्ही सायबर सेलशी संपर्क साधू शकता, असे शर्लिन चोप्राने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, पूनम पांडे यांनी राज कुंद्रा प्रकरणातही अनेक खुलासे केले आहेत. आपल्याला करारावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले गेले होते, असे तिने म्हटले होते. जेव्हा तिने असे करण्यास नकार दिला तेव्हा तिला तिची वैयक्तिक माहिती आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती.