घाटकोपर होर्डिंग दुर्घटना – तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांचे निलंबन

होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले होते

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना – तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांचे निलंबन

घाटकोपर येथे कोसळलेल्या होर्डिंग दुर्घटना प्रकरणात लोहमार्ग पोलीस दलाचे तत्कालीन पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.कैसर खालीद हे महाराष्ट्र कॅडरचे १९९७ आयपीएस अधिकारी आहे. कैसर खालीद हे सध्या नागरी हक्क संरक्षण येथे अपर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते.

पोलिस वेल्फेअर निधीसाठी राखीव असलेल्या घाटकोपर पूर्व येथील जागेवर इगो मीडिया या कंपनीकडून उभारण्यात आलेल्या महाकाय होर्डिंग १३ मे रोजी कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता, आणि ८० जण जखमी झाले होते.

लोहमार्ग पोलिसांच्या अखत्यारीत येणाऱ्या या जागेवर उभारण्यात आलेल्या या बेकायदेशीर होर्डिंगला लोहमार्ग रेल्वे पोलीस दलाचे तत्कालीन पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी मंजुरी दिली होती.

याप्रकरणी पंतनगर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने या प्रकरणात इगो मीडिया कंपनीचे मालक भावेश भिंडे, माजी संचालिका जान्हवी मराठे सह चार जणांना करण्यात आली होती.

हे ही वाचा:

पवार, ठाकरे, जरांगेंचे गलिच्छ राजकारण चालू देणार नाही!

“के सुरेश यांना नामनिर्देशित करणं हा काँग्रेसचा एकतर्फी निर्णय”

केजरीवालांचा मुक्काम तिहारमध्येचं; जामीन देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाकडून रद्द!

पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर

विशेष तपास पथकाकडून या प्रकरणात लोहमार्ग पोलीस तसेच महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यासह अनेकांचे जबाब नोंदविण्यात आले आहे. विशेष पथकाच्या तपासात तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्त यांचा बेजबाबदार पणा आढळून आला आहे.

या अनुषंगाने सध्या नागरिक हक्क संरक्षण महाराष्ट्र राज्य येथे अप्पर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत असलेले कैसर खालिद यांचे निलंबन करण्यात आले आहे.राज्याच्या गृहविभागाने मंगळवारी खालिद यांच्या निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला आहे.

Exit mobile version