‘सेकस्टोर्शन’ च्या जाचाला कंटाळून रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या

महिलेसह तीन जणांवर गुन्हा दाखल

‘सेकस्टोर्शन’ च्या जाचाला कंटाळून रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या

सेक्सटॉर्शनच्या जाचाला कंटाळून माटुंगा रेल्वे वर्कशॉप मध्ये काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याने ट्रेनखाली आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी एका अनोळखी महिलेसह तीन जणांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जगदीश डाबी (३७) असे रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. जगदीश डाबी हे पत्नी आणि दोन मुलांसह डोंबवली पूर्व येथे राहण्यास होते. मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉप मध्ये काम करणाऱ्या जगदीशचे फेसबुकवर एका अनोळखी महिलेसोबत ओळख झाली होती.

त्यानंतर या महिलेने ऑनलाइन सेक्सच्या नावाखाली जगदीश डाबी याचे अश्लील व्हिडीओ बनवून त्याला ब्लॅकमेल करायला लागली.

जगदीश याने व्हिडीओ व्हायरल होऊ नये म्हणून या अनोळखी महिलेच्या वेगवेगळ्या बँक खात्यावर वेळोवेळी २ लाख रुपये पाठवले होते. त्यानंतर देखील या अनोळखी महिलेसह इतर दोघे त्याला कॉल करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन सतत पैशांची मागणी करीत होते.अखेर या त्रासाला कंटाळून जगदीश याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊन आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट बनवली.

हे ही वाचा:

इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेला आठवला मुंबईवरील २६/११ चा दहशतवादी हल्ला

भारतातील जनता इस्रायलच्या बाजूने

मनी लाँड्रिंग प्रकरणी व्हिवोच्या अधिकाऱ्यांना अटक

दादा भुसेंचा सुषमा अंधारेंना इशारा!

या सुसाईड नोट मध्ये एका महिलेसह तीन जणांच्या नावाचा उल्लेख करून त्यांनी आता पर्यत दिलेल्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहुन सुसाईड नोट खिशात ठेवून सोमवारी कामावरून सुटल्यानंतर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जगदीश याने माटुंगा रेल्वे स्थानकवरील सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या स्लो ट्रेन खाली स्वतःला झोकावून आत्महत्या केली अशी माहिती दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी दिली.

याप्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी अनोळखी महिलेसह तीन जणांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Exit mobile version