26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामाप्रदीप शर्मा यांचे फाउंडेशन एनआयएच्या रडारवर 

प्रदीप शर्मा यांचे फाउंडेशन एनआयएच्या रडारवर 

Google News Follow

Related

अँटालिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने अटक केलेल्या एन्काउंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा याचे पीएस फाऊंडेशन एनआयएच्या रडारवर आले आहे. पीएस फाउंडेशनच्या अंधेरी पूर्व येथील कार्यालयावर एनआयएने दुसऱ्यांदा छापेमारी करून काही कागदपत्रे ताब्यात घेण्यात आले आहे.

पीएस फाऊंडेशन या संस्थेच्या मार्फत या प्रकरणात काही व्यवहार झाले आहे का हे तपासले जात असल्याची माहिती समोर येत आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट चकमक फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यासह पाच जणांना नुकतीच एनआयएने अटक केली आहे.

हे ही वाचा:

रिटायर्ड एसीपी पुत्राला ५०लाखाच्या ड्रग्ससह अटक

रिटायर्ड एसीपी पुत्राला ५०लाखाच्या ड्रग्ससह अटक

अरेरे! ७ वर्षांच्या मुलासह मातेने घेतली १२व्या मजल्यावरून उडी

वसई-विरारमधील बांधकाम माफियांना कुणाचा आशीर्वाद?

प्रदीप शर्मा हे एनआयएच्या कोठडीत असून बुधवारी सायंकाळी एनआयएने अंधेरी येथील प्रदीप शर्मा यांचे पीएस फाउंडेशन या संस्थेच्या कार्यालयात छापा टाकला. एनआयए या कार्यालयात एक तास येथील कागदपत्रे तपासली असून कार्यालयात शोध मोहीम राबवली होती.

एनआयच्या पथकाने काही महत्वाचे कागदपत्रे ताब्यात घेऊन तासाभराने संस्थेचे कार्यालय सोडले. शर्मा यांना अटक केली त्या दिवशी देखील एनआयएन पीएस फाऊंडेशन कार्यालयाची झाडाझडती घेऊन काही दस्तवेज ताब्यात घेण्यात आले होते.

प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून मनसुख हिरेन याची हत्या केल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींनी एनआयएला दिली असल्याचे समोर आले आहे, या हत्येसाठी काही आर्थिक व्यवहार झाला आहे का ? तसेच या प्रकरणात पीएस फाउंडेशन या संस्थेचा कुठे वापर झाला का ? याचा तपास करण्यासाठी ही छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

  1. प्रदिप शर्मा च्या बाबतित खूप ऊशिर झाला आस वाटत नाही का?कारण मनसुख च्या शेवट चे लोकेशन वसईनालासोपारा दाखवत होते

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा