शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडीने) परिवहन विभागाचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. या पूर्वीच अनिल परब यांना ईडीने समन्स बजावले होते व मंगळवारी त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलवण्यात आलेले आहे.
परिवहन विभागाचे निलंबित आरटीओ अधिकारी गजेंद्र पाटील यांनी परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यासह पाच जणांविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जात बदली आणि पोस्टिंगसाठी कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप लावण्यात आलेला आहे. हा आर्थिक व्यवहार २५० ते ३०० कोटींच्या घरात असल्याचे तक्रार अर्जात गजेंद्र पाटील यांनी केला आहे. १५ मे रोजी हा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता . या रॅकेटचे मास्टरमाइंड डेप्युटी आरटीओ बजरंग खरमाटे असल्याचा आरोप करण्यात आला होता.
दरम्यान, ईडीने सोमवारी खरमाटे यांच्या नागपूरच्या घरी छापेमारी सुरू केली असून या संदर्भात काही पुरावे,कागदपत्रे सापडतात का त्यांच्या व्यवहाराबाबत देखील चौकशी सुरू आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने शनिवारीच समन्स बजावून मंगळवारी चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या यवतमाळ येथील घरावर ईडीने सोमवारी सकाळपासून छापेमारी सुरू केली होती. भावना गवळी यांच्यावर १७ कोटीच्या मनी लॉनदरिंग प्रकरणात गवळी यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सचिन वाझेने अनिल परब यांच्यावर केला होता आरोप
सचिन वाजे हा एनसीबीची कोठडी असतांना त्याने लेटरबॉम्ब फोडला होता, त्यात त्याने राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर वसुलीचे आरोपी लावले होते. पत्रात सचिन वाझे यांनी शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांना पैसे वसूल करण्यास सांगितले असल्याचा आरोपही केला आहे.
वाझे यांनी पत्रात लिहिले होते की, ते २०२० च्या जुलै-ऑगस्टमध्ये अनिल परब यांना भेटले. परब यांनी त्यांना सैफी बुरहानी उन्नती ट्रस्टकडून ५० कोटी वसूल करण्यास सांगितले. या ट्रस्टच्या विरोधात चौकशी सुरू होती. वाझे यांनी लिहिले, “२०२० च्या जुलै-ऑगस्टमध्ये मला अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी बोलावण्यात होते. मीटिंगमध्ये परब यांनी मला प्राथमिक चौकशीसाठी प्राप्त झालेल्या तक्रारीकडे लक्ष देण्यास सांगितले आणि तपासावर चर्चा करण्यासाठी विश्वस्तांना त्याच्याकडे आणण्यास सांगितले.
हे ही वाचा:
आता नव्या उत्पादनांचीही होणार परदेशवारी
उद्धवजी, लक्ष द्या, एसटी कर्मचाऱ्यांची कुटुंबे आर्थिक संकटात आहेत!
राष्ट्रपती कोविंद म्हणतात, जिथे प्रभू रामचंद्र, तीच अयोध्या!
औरंगजेब म्हणत आहे, इम्रान खान सरकार खोटारडे!
त्यांनी मला चौकशी बंद करण्यासाठी SBUT कडून ५० कोटींची मागणी करण्यास सांगितले होते, मात्र मी अशी कोणतीही गोष्ट करण्यास मी असमर्थता व्यक्त केली होती. कारण मी SBUT (ट्रस्ट) तसेच गुन्ह्यातील कोणालाही ओळखत नव्हतो असा पत्रात वाझेने म्हटले होते.