हिरानंदानी समुहावर ईडीचे छापे, फेमा कायद्याअंतर्गत छापेमारी

हिरानंदानी समुहावर ईडीचे छापे, फेमा कायद्याअंतर्गत छापेमारी

बांधकाम व्यवसायात अग्रेसर असलेल्या हिरानंदानी समूहाच्या नवी मुंबईतील कार्यालये तसेच संबंधित ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी छापेमारी केली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परकीय चलन व्यवस्थापन कायदा अंतर्गत ही छापेमारी करण्यात आली आहे.

हिरानंदानी समूहाच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने फेमा च्या अंतर्गत हिरानंदानी समूहाच्या संबंधित नवीमुंबईतील कार्यालयात गुरुवारी सकाळपासून छापेमारी करण्यात येत होती. २०२२ मध्ये देखील सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने बांधकाम व्यवसायिक हिरानंदानी गसमूहाच्या २४ ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली होती. ही छापेमारी मुंबई, चेन्नई आणि बंगळुरू या ठिकाणी करण्यात आली होती. समूहाच्या संचालकांच्या ठिकाणांवरही कारवाई करण्यात आली होती.

हे ही वाचा:

धारावीतील बेकायदेशीर कुंटणखाना उद्ध्वस्त, ४ जणींची सुटका,१ अटक

उद्धव ठाकरे गटाला पुन्हा खिंडार!

टीएमसी नेत्यांवर महिलांचे गंभीर आरोप

कोलकत्ता उच्च न्यायालयाने बंगाल पोलिसांना फटकारले

 

मुंबई स्थित २५० एकर जागेत विस्तारलेल्या या टाऊनशीपमध्ये ४२ निवासी भवन आणि २३ व्यापारी भवन आहेत. फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट (फेमा) अंतर्गत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हिरानंदानी समूहाच्या मुख्य कार्यालयासह चार ते पाच ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. यापूर्वी, मार्च २०२२ मध्ये, आयकर (आय-टी) विभागाने मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नई या तीन शहरांमध्ये पसरलेल्या हिरानंदानी समूहाच्या सुमारे २५ ठिकाणी छापेमारी केली होती. हिरानंदानी समूहानलने कर चुकवेगिरी केल्याच्या संशयावरून छापे टाकण्यात आले होते.

Exit mobile version