माध्यान्ह भोजन घोटाळ्याप्रकणी मुंबईत छापेमारी

सायनमधील एका झोपडपट्टीमध्ये ही छापेमारी सध्या सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

माध्यान्ह भोजन घोटाळ्याप्रकणी मुंबईत छापेमारी

देशाच्या विविध भागांतून माध्यान्ह भोजन घोटाळ्याची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. यामुळे आयकर विभाग ऍक्शन मोडमध्ये आले असून, याप्रकरणी आयकर विभाग अनेक ठिकाणी छापेमारी करत आहे. याप्रकरणी आयकर विभागाने मुंबईतील अनेक ठिकाणी छापेमारी सुरु केली आहे.

आयकर पथकाकडून मुंबईतील चार ते पाच परिसरात झडती घेण्यात येत आहे. मुंबईतील सायन आणि बोरिवली परिसरात आयकर विभागाने छापेमारी सुरु केली आहे. सायनमधील एका झोपडपट्टीमध्ये ही छापेमारी सध्या सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. आयकर विभागाला काही विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर छापे टाकण्यात येत असल्याची माहिती आहे.

मध्य प्रदेशात घरपोच रेशन आणि अन्न योजनेतील मोठा घोटाळा उघडकीस आला. कॅगच्या अहवालात हा घोटाळा झाला होता. हा घोटाळा समोर आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बचत गटांना माध्यान्ह भोजन वाटपाच्या बदल्यात लाच मागितल्याप्रकरणी टास्क मॅनेजर कीनल त्रिपाठी यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याने चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना दहा हजार रुपये दंड देखील ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास त्याला अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हे ही वाचा:

आज होणार राजपथचे कर्तव्यपथ

निष्पाप बळी घेणाऱ्या याकुब मेमनच्या कबरीला संगमरवरी फरशी

अमरावतीमधील ‘त्या’ मुलीचा लागला शोध

अमित शहांच्या दौऱ्यावेळी तोतयागिरी करणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

माध्यान्ह भोजन प्रकरणी देशभरात दिल्ली, गाझियाबाद, लखनौ, गुरुग्राम आणि जयपूरसह अनेक शहरांमध्ये छापेमारी सुरु आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात छापेमारीत महाराष्ट्रातील २४ ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली होती. यामध्ये पंढरपूरमधील उद्योजक अभिजीत पाटील यांच्याशी निगडित असलेल्या तीन साखर कारखान्यांवर देखील आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत.

Exit mobile version