आरेच्या!! सीईओच्या घरात सापडली साडेतीन कोटीची बेहिशोबी रोकड 

आरेच्या!! सीईओच्या घरात सापडली साडेतीन कोटीची बेहिशोबी रोकड 

लाच प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरे वसाहतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांच्या घरातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुमारे साडे तीन कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. नथू राठोड यांच्याविरुद्ध यापूर्वी देखील विभागाकडे अनेक तक्रारी आलेल्या होत्या. त्या बाबत देखील चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे ही वाचा :

शिवसेनेची झाली सोनिया सेना

ठाकरे सरकारचा तुघलकी निर्णय, १३०० कंत्राटी डॉक्टरांना केले सेवामुक्त

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर हल्ला

नालेसफाईचा दावा फोल, टक्केवारीच्या कारभाराचे भाजपाकडून पोस्टमार्टम

गोरेगाव पूर्व येथील आरे वसाहतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांना आणि त्याच्या शिपाई अरविंद तिवारी याला तेथील रहिवाश्याच्या घराची डागडुजी करण्यासाठ ५० हजार रुपयांची लाच घेताना सोमवारी अटक करण्यात आली होती.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळावारी नथू राठोड यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात ३ कोटी ४६ लाख १० हजार रुपयांची रोकड मिळून आली. याबाबत रोकडबाबत चौकशी करण्यात आली असता नथू राठोड यांच्या घरातील सर्व रोकड बेहिशेबी असल्याचे समोर आले आले.

लाचलुपचत प्रतिबंधक विभागाने ही रोकड ताब्यात घेऊन जप्त केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्राच्या म्हणण्यानुसार नथू राठोड यांच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावर असणारी मुंबई आणि गावाकडील संपत्तीची देखील चौकशी करण्यात येणार असून त्यांचे बँक खाते तपासण्यात येणार आहेत. या तपासानंतर ही रोकड नेमकी कुठून मिळाली याचा शोध घेतला जाणार आहे. या संपत्तीचीही पाळेमुळे पोलिस खणून काढतील.

Exit mobile version