24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाराहुल नार्वेकरांचा ईमेल आयडी हॅक, मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा 

राहुल नार्वेकरांचा ईमेल आयडी हॅक, मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा 

गुन्हेगाराचा तपास सुरू

Google News Follow

Related

मुंबईतील राजकीय वातावरण तापलेले असताना एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एका अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या ईमेल आयडी हॅक करून ईमेल आयडी खात्यावर अनधिकृत प्रवेश मिळवला. त्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांना ईमेल पाठवला. सोमवारी प्राप्त झालेल्या ईमेलमध्ये सभापती नार्वेकर यांच्या स्वाक्षरी असलेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात अनुचित वर्तन केल्याबद्दल काही आमदारांवर कारवाई करण्याचे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांना करण्यात आले आहे.

ईमेल प्राप्त झाल्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी त्याची सत्यता पडताळण्यासाठी तातडीने विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला. मात्र, नार्वेकर यांनी असे कोणतेही पत्र ईमेलद्वारे पाठविले नसल्याचे संगितले. त्यानंतर आपल्या ईमेलमध्ये काहीतरी गडबड  झाल्याचे लक्षात येताच नार्वेकर यांनी तातडीने मरीन ड्राइव्ह पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात हॅकरविरुद्ध माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ डी, ६६ सी आणि भारतीय दंड संहिता कलम ४१९ आणि १७० अन्वये   गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.

विधानसभेत राज्याच्या अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान नुकत्याच झालेल्या वादाचा संदर्भ देत फसव्या ईमेलमध्ये आमदार दादा भुसे यांना विशेष लक्ष्य करण्यात आले होते. ही घटना उच्च-प्रोफाइल अधिकाऱ्यांच्या  सुरक्षेबद्दल चिंता निर्माण करत आहे. सध्या सुरू असलेल्या तपासाचा उद्देश गुन्हेगाराचा शोध घेणे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल  नार्वेकर यांच्या ईमेल आयडी सुरक्षा अबाधित ठेवणे  हे आहे.

हे ही वाचा:

अनिल देसाई यांची सात तास कसून चौकशी

मालदीवने दाखविली मस्ती…१० मे नंतर एकही भारतीय सैनिक इथे राहणार नाही!

परिवारवादी लोक काळा पैसा लपवण्यासाठी भारताबाहेर बँक खाती उघडतात!

स्वातंत्र्यवीरांचा उल्लेख झालाच पाहिजे

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपशब्द वापल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी दोघांना अटक केली होती. तसेच ११ निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सह्या केल्याचे प्रकरण देखील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल असून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक करून राज्यपालांना मेल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या संदर्भात मुंबई पोलिसात दाखल झालेल्या गुन्हा प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा