मोदी या आडनावावरून केलेल्या टिप्पणीमुळे काँग्रेस नेते राहुल गांधी अडचणीत सापडले असून सूरतच्या न्यायालयाने त्यांना यात दोषी धरले असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अर्थात, हा गुन्हा जामिनपात्र आहे, त्यामुळे त्यांना जामीनही मिळाला आहे. ३० दिवसांत त्यांना सूरत सत्र न्यायालयातच अपील करता येईल.
राहुल गांधी यांना यासंदर्भात दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते आणि तशी शिक्षा झाली तर त्यांचे संसदेतील सदस्यत्वही रद्द होऊ शकते. हा निकाल न्यायालयाने जेव्हा दिला तेव्हा राहुल गांधीही न्यायालयात उपस्थित होते. २०१९मध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली होती. कर्नाटकमधील निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी मोदी या आडनावावरून आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. राहुल गांधी यांनी या प्रचारादरम्यान नीरव मोदी, ललित मोदी यांच्या नावांचा उल्लेख करत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यानंतर भाजपाचे आमदार प्रणेश मोदी यांनी याविरोधात याचिका दाखल केली होती.
हे ही वाचा:
अमृतपाल सिंहचे काय झाले? न्यायालयालाही पडलाय प्रश्न…
जिच्या हाती ‘वंदे भारत’ची दोरी..
गायक सोनू निगम यांच्या वडिलांच्या घरातून लुटले ७२ लाख, वाहन चालकाविरुद्ध गुन्हा
माहीममध्ये उभी राहतेय ‘दुसरी हाजीअली’; समुद्रातील अनधिकृत मजारीचा राज ठाकरेंनी केला पर्दाफाश
राहुल गांधी यांना यासंदर्भात तीनवेळा न्यायालयात हजर राहावे लागले होते. त्यावेळी राहुल गांधी यांनी म्हटले होते की, आपण निवडणुकीच्या प्रचारात जे बोललो ते आपल्याला लक्षात नाही. आपण असे कोणतेही विधान जाणीवपूर्वक केलेले नाही. आपल्याला शिक्षा झाल्यास ती कमी करावी अशी मागणीही वकिलांच्या मार्फत करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचे व्हीडिओ रेकॉर्डिंगही न्यायालयात सादर करण्यात आले. शिवाय, निवडणूक अधिकाऱ्यालाही न्यायालयात बोलावण्यात आले होते.