कुवेतमधून पत्नीला दिला तिहेरी तलाक; पाकिस्तानी महिलेशी केला विवाह, राजस्थानात अटक

हुंड्यासाठी केला गेला छळ,

कुवेतमधून पत्नीला दिला तिहेरी तलाक; पाकिस्तानी महिलेशी केला विवाह, राजस्थानात अटक

थेट कुवेतहून भारतातल्या पत्नीला फोनवरून तलाक दिल्यानंतर तिथे लग्न करून भारतात आलेल्या रेहमानला राजस्थानात अटक करण्यात आली.

३५ वर्षीय रेहमानने फोनवरून राजस्थानात असलेल्या आपल्या पत्नीला तलाक दिला आणि तिथे पाकिस्तानी महिलेशी विवाह केला. सोशल मीडियावर त्याची पाकिस्तानी महिलेशी ओळख झाली. त्यानंतर सौदी अरेबियात त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर तो राजस्थानातील चुरू येथे पत्नीसह दाखल झाला.

२७ जुलैला रहमानची २९ वर्षीय पत्नी फरिदा बानोने आपल्या वडिलांसह पोलिस ठाण्यात रहमानविरोधात एफआयआर दाखल केला. फोनवरून आपल्याला ट्रिपल तलाक दिल्याची तिची तक्रार होती. तिने आपल्या तक्रारीत असेही म्हटले की, रहमान आणि त्याचे कुटुंबीय हुंड्यासाठी तिला मारहाण करत असत. पैसे आणि बाईकसाठी त्यांच्याकडून सतत मागणी केली जात असे. रहमानने तिला सांगितले की, तो तिच्यासोबत फार काळ राहणार नाही. तेव्हा त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस काढण्यात आली. तेव्हा तो कुवेतला होता.

हे ही वाचा:

पोलिसांच्या नाकाबंदीत २ कोटींचा ड्रग्स साठा जप्त, एकाला अटक

गंमतच आहे! कोलकात्यातील बलात्कार, हत्या प्रकरणी ममताच काढणार निषेध मोर्चा

पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेला आरोपी सापडला राजस्थानात

पवारांनी वाटोळे केले ना? मग त्यांचेही उमेदवार पाडा…

पण जेव्हा तो राजस्थानात आला. जयपूर विमानतळावर तो दाखल झाला त्याचवेळी पोलिसांनी त्याला अटक केली.

रहमान आणि फरिदा यांचा १७ मार्च २०११ला विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कुवेतमध्ये तो वाहतूक विभागात काम करत होता.

जिथे त्याच्या पहिल्या पत्नीने तक्रार केली होती, त्या हनुमानगढमधील पोलिस अधिकारी रणवीर सिंग यांनी सांगितले की, रहमानने पाकिस्तानी तरुणी मेहविशसह विवाह केला होता. त्याच्या पहिल्या पत्नीने असेही म्हटले होते की, रहमानची दुसरी पत्नी पाकिस्तानी हेर असू शकते. त्यादृष्टीने तिची चौकशी व्हावी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर तिहेरी तलाक रद्द करण्यात आला. त्यामुळे मुस्लिम महिलांना न्याय मिळू लागला.

 

Exit mobile version