नूहमध्ये पुन्हा जातीय तणाव; विहिरीचे पूजन करण्यास जाणाऱ्या महिलांवर मदरशातून दगडफेक?

नूहमध्ये पुन्हा जातीय तणाव; विहिरीचे पूजन करण्यास जाणाऱ्या महिलांवर मदरशातून दगडफेक?

हरियाणातील नूहमध्ये पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. नूहमध्ये गुरुवारी रात्री विहिरीचे पूजन करण्यासाठी जाणाऱ्या महिलांवर एका मदरशातून काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याचा आरोप होत आहे. या दगडफेकीत तीन महिला जखमी झाल्या. या घटनेनंतर परिसरात पोलिस पथक तैनात करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

घटनेची माहिती मिळताच नूहचे पोलिस अधीक्षक नरेंद्र बिजारानिया पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लोकांची समजूत काढली. या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसली तरी कायद्यानुसार योग्य कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

ही घटना रात्री आठ वाजून २० मिनिटांनी झाली. या सुमारास काही महिला विहिरीचे पूजन करण्यासाठी जात होत्या. जेव्हा या महिला मदरशाजवळ पोहोचल्या तेव्हा मदरशातील काही मुलांनी त्यांच्यावर दगडफेक केल्याचा आरोप होत आहे. यात तीन महिला जखमी झाल्या. या घटनेनंतर दोन्ही समुदायाचे नागरिक जमा झाले. तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

हे ही वाचा:

अहमदाबादमधील ‘फायनल’ ठरते आहे महागडी

मुंबईतील हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांची वाहनांवर कारवाई

वर्षा गायकवाड यांचे आरोप खोडसाळ स्वरूपाचे

मुंबईकरांनी उडवले ५०० कोटींचे फटाके

याआधी ३१ जुलै रोजी नूहमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या शोभायात्रेवर जमावाने हल्ला केला होता. त्यानंतर येथे जातीय हिंसाचार उसळला होता. त्यात होमगार्डच्या दोन जवानांसह मशिदीच्या एका मौलवीसह सहा जणांचा मृत्यू झाला होता.

Exit mobile version