चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू प्रकरणी ‘पुष्पा’ फेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक

१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे

चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू प्रकरणी ‘पुष्पा’ फेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक

दाक्षिणात्य सिनेसृष्टीमधील अभिनेता अल्लू अर्जुन याला अटक करण्यात आली आहे. हैदराबादमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक झाली आहे. हैदराबादमध्ये झालेल्या या चेंगराचेंगरीत ३५ वर्षीय एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणीचं अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल झाला असून त्याला चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये कलम १०५ (जीवघेणं कृत्य) आणि कलम ११८ (जाणूनबुजून इतरांच इजा पोहोचवणं) या कलमांची नोंद एफआयआरमध्ये करण्यात आली आहे. चिक्कपडल्ली पोलीस स्थानकात मृत महिलेच्या नातेवाईकांनी या सर्व प्रकाराबाबत तक्रार दाखल केली होती.

४ डिसेंबर रोजी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जुनच्या उपस्थितीमुळे चेंगराचेंगरी झाली होती. अल्लू अर्जूनला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती. याचं चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. ‘पुष्पा २’ च्या प्रीमियरसाठी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जुनने हजेरी लावली. त्याला भेटण्यासाठी चाहत्यांनी गर्दी आणि गोंधळ केला. यावेळी गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणात अल्लू अर्जूनवर मृत महिलेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आता हैदराबाद पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता त्याच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुष्पा फेम अल्लू अर्जुनला पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन अटक केली. त्यानंतर त्याला हैद्राबादच्या गांधी रुग्णालयात मेडिकल टेस्टसाठी हजर करण्यात आलं.

हे ही वाचा : 

एएमयूमधील बांगलादेशी विद्यार्थ्यांकडून भारत आणि महिलांबद्दल अपशब्द!

वक्फ बोर्ड म्हणते औसामधील १७५ एकर जमीन आमची! तळेगावनंतर नवा दावा

एनआयएने अमरावतीमधून ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या डायरीमधून सापडले पाकिस्तानी नंबर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला उडवून देण्याची धमकी; रशियन भाषेत आला मेल

माहितीनुसार, अल्लू अर्जुन आणि त्याची टीम संबंधित थिएटरवर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियरसाठी येणार आहे, याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे त्यांना गर्दीला आवर घालण्यात अडचणी आल्या.

Exit mobile version