पंजाबी गायक दलेर मेहंदीला अटक, २ वर्षाचा तुरुंगवास

पंजाबी गायक दलेर मेहंदीला अटक, २ वर्षाचा तुरुंगवास

प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी याला १८ वर्षे जुन्या मानवी तस्करी प्रकरणात दोन वर्षाचा तुरुंगवास झाला आहे. २००३ मध्ये दलेर मेहंदीवर गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये त्याला यापूर्वी दोन वर्षांची शिक्षा झाली होती. पण या शिक्षेला त्याने पटियालाच्या सत्र न्यायालयात आव्हान दिले. तेथेही शिक्षा कायम राहिल्याने गुरुवार, १४ जुलैला त्याला अटक करण्यात आली. दलेरला आता शिक्षा भोगण्यासाठी पटियाला मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे.

दलेर मेहंदीवर लोकांना अवैधरित्या परदेशात नेल्याचा आरोप आहे. जेव्हा हे प्रकरण न्यायालयात पोहोचले तेव्हा हे आरोप खरे असल्याचे आढळून आले आणि या प्रकरणात १५ वर्षांनंतर म्हणजेच २०१८ मध्ये दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर शिक्षेला आव्हान देणारी याचिका दलेर मेहंदीने दाखल केली होती. त्यानंतर गुरुवारी न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावत शिक्षा कायम ठेवली आहे. त्याला अटक करण्यात आली असून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. तक्रारदाराचे वकील गुरमीत सिंग यांनी सांगितले की, न्यायालयाने अर्ज फेटाळला आहे, त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

संसाराचा त्याग करून भगवे झाले जितेंद्र नारायण त्यागी

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा, काँग्रेसला झटका

‘द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून विक्रमी मते मिळतील’

अधिकार पदावरील जिहादींवर कारवाई कधी?

दलेर मेहंदी आणि त्याचा भाऊ समशेर लोकांना अवैधरित्या परदेशात पाठवण्यासाठी मोठी रक्कम घेत होते, असा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी दलेर मेहंदी आणि त्याच्या भावावर एकूण ३१ गुन्हे दाखल आहेत. अमेरिकेत २००३ मध्ये पहिला गुन्हा दाखल झाला कारण बहुतेक लोकांना अमेरिकेत पाठवण्यात आले होते.

Exit mobile version