दारू समजून कीटकनाशकाचे सेवन केल्याने अभिनेत्याचा मृत्यू

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेता रणदीपसिंग भंगूचे निधन

दारू समजून कीटकनाशकाचे सेवन केल्याने अभिनेत्याचा मृत्यू

पंजाबी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता रणदीपसिंह भंगू याचे निधन झाले. त्यांच्या या अचानक मृत्यूमुळे चित्रपटउद्योगात हळहहळ व्यक्त होत आहे. त्याने अवघ्या ३२व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्याने कीटकनाशक औषधाचे सेवन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. रणदीपने दारू समजून कीटकनाशक प्यायल्याने त्याचा मृत्यू झाला.

रणदीपच्या मृत्यूचे वृत्त समजल्यानंतर पंजाब चित्रपटउद्योगातील अनेक अभिनेता-अभिनेत्रींनी दुःख व्यक्त केले. सोशल मीडियावर याबाबतचे वृत्त देण्यात आले. ‘अतीव दुःखाने युवा अभिनेता रणदीपसिंग भंगू याच्या अचानक निधनाची सूचना आपणास द्यावी लागत आहे. ते हे जग सोडून परमात्म्यात विलीन झाले आहेत,’ असे यात नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

रेल्वेच्या सुविधा, प्लॅटफॉर्म तिकिटावर कर नाही!

NEET पेपर लीक प्रकरणी महाराष्ट्रातून दोन शिक्षकांना घेतलं ताब्यात!

लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रज्वल रेवण्णाच्या भावालाही अटक!

अरविंद केजरीवाल यांचे वजन घटू लागले !

रणदीपच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. रणदीप काही दिवसांपासून दारूचे सेवन करत होता. दारूच्या नशेतच त्याने स्वतःचा जीव गमावला. दारूच्या नशेत त्याने शेतातील मोटरवर ठेवलेली कीटकनाशकाची बाटली दारू समजून घेतली आणि पिऊन टाकली. त्यानंतर अचानक अभिनेत्याची प्रकृती बिघडली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला.

Exit mobile version