पंजाबचे गायक सिद्धू मूसवाला याची हत्या

पंजाबचे गायक सिद्धू मूसवाला याची हत्या

पंजाबमधील आप सरकारने काल चारशेहून अधिक जणांची सुरक्षा काढली होती. या निर्णयाला एक दिवस उलटत नाही तोवर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले लोकप्रिय पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मूसवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

रविवारी, २८ मे रोजी सिद्धू मूसवाला मानसा गावात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्याला गंभीर अवस्थेत तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात आणखी दोन जण जखमी झाले आहेत.
पंजाब सरकारने मूसवालासह ४२४ हून अधिक लोकांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर हा हल्ला झाला आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक (सुरक्षा) यांनी शुक्रवारी एका आदेशात म्हटले होते की सुरक्षा कर्मचार्‍यांना “कायदा आणि सुव्यवस्थेच्या आपत्कालीन कर्तव्याच्या संदर्भात पूर्णपणे तात्पुरत्या आधारावर काढले जात आहे”. त्यांनतर आज रविवारी लगेच मूसवाला याची हत्या झाली आहे.

हे ही वाचा:

…तर हिंदूंना देश उरणार नाही!

देहूत पंतप्रधान मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी

‘ह्या’ राज्यात आहे देशातील सर्वात जास्त सोन्याचा साठा

पंतप्रधान मोदी साधणार अनाथ मुलांशी संवाद

मूसवाला यांनी गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि मानसामधून पंजाब विधानसभा निवडणूक लढवली होती. आम आदमी पक्षाच्या डॉ. विजय सिंगला यांच्याकडून त्यांचा ६० हजाराहून अधिक मतांनी पराभव झाला होता. पंजाबमधील काँग्रेस उमेदवार आणि प्रतिभावान संगीतकार सिद्धू मूसवाला यांच्या हत्येने काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे.

Exit mobile version