पंजाब पोलिसांनी केला हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश, दोघांना अटक

पंजाब पोलिसांनी केला हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश, दोघांना अटक

पंजाब पोलिसांनी गुरुवार, १९ मे रोजी एका हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. गोपनीय माहितीची देवाणघेवाण केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि देशद्रोह्यांचे नेटवर्क तोडण्यासाठी पंजाब पोलीस मोहीम राबवत आहेत. या दरम्यानच पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, राज्याच्या स्पेशल ऑपरेशन सेल अमृतसरने कोलकाता येथील रहिवासी जफर रियाझ आणि बिहारचा रहिवासी मोहम्मद शमशाद यांना अटक केली आहे. हे दोघेही अमृतसरमधील मिराकोट चौकात भाड्याच्या ठिकाणी राहत असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी अधिकृत गुप्त कायदा आणि आयपीसीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या दोन आरोपींवर गोपनीय माहितीची देवाणघेवाण केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्या दोघांना त्वरित अटकदेखील केले आहे.

हे ही वाचा:

दर्जेदार वृत्तसंकेस्थळ म्हणून ‘न्यूज डंका’ चा गौरव

राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या, ईडीकडून गुन्हा दाखल

मध्य प्रदेशला जे जमले ते महाराष्ट्राला जमले नाही

महाराष्ट्र सरकारची निती ओबीसी विरोधी, सरकारने ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला

दरम्यान, अलीकडेच पंजाबच्या मोहालीमध्ये पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर हल्ला झाला होता. आरोपींनी रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडने (आरपीजी) पोलीस कार्यालयाच्या इमारतीला लक्ष्य केले होते. या प्रकरणात पंजाब पोलिसांनी लखबीर सिंग लांडा याला या प्रकरणातील मुख्य सूत्रधार घोषित केले. तो पंजाबमधील तरन तारण जिल्ह्यातील रहिवासी होता. तो एक गुंड असून २०१७ मध्ये तो कॅनडाला पळून गेला होता.

Exit mobile version