अमृतसरजवळील जंदियाला गुरु येथे बुधवारी सकाळी पंजाब पोलिसांसोबत झालेल्या गोळीबारात अमृतपाल सिंग या २२ वर्षीय गुंडाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी त्याला त्या ठिकाणी नेले जेथे त्याने २ किलो हेरॉईन आणि एक पिस्तूल लपवून ठेवले होते. अमृतसर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सतींदर सिंग यांच्या म्हणण्यानुसार, अमृतपालने चौकशीदरम्यान अंमली पदार्थ आणि शस्त्राचे ठिकाण उघड केले होते.पोलिसांनी अमृतपाल सिंगला त्या ठिकाणी नेले असता ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपालने सांगितलेल्या ठिकाणी पोलीस त्याला घेऊन गेले.अमृतपालने त्याच्या हातकडीमध्ये लपवून ठेवलेले पिस्तुल बाहेर काढून पोलिसांवर गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी प्रत्युत्तर देत त्याच्यावर गोळी झाडली, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला.अमृतपालने केलेल्या गोळीबारात दोन पोलीस अधिकारी जखमी झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
दहशतवादी पन्नूच्या हत्येच्या कटावर मोदींचे महत्त्वाचे विधान!
सर्वज्ञानी सुषमा अंधारेंनी ‘त्या’ प्रकरणी दिलगिरीचे पत्र द्यावे, अन्यथा…
दारू माफियांनी पोलीस उपनिरीक्षकाला उडवले!
जगदीप धनखड यांना पंतप्रधानांचा फोन
अमृतपाल हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि इतर गुन्ह्यांचे आरोप होते, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरून हेरॉईन आणि शस्त्र जप्त केले असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.