पंजाबमधील अमृतसरमधील एका मंदिरात मोठा स्फोट झाला आहे. मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी मंदिरावर ग्रेनेड हल्ला केला. त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की दोन तरुण मोटारसायकलवरून येतात आणि मंदिराबाहेर काही सेकंद उभे राहून मंदिराच्या दिशेने काहीतरी फेकतो. यानंतर हे तरुण घटनास्थळावरून पळून जाताच मंदिरात एकच मोठा स्फोट होतो.
हे प्रकरण अमृतसरच्या खंडवाला परिसरातील ठाकूरद्वारा मंदिराचे आहे. या मंदिरावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला रात्री उशिरा १२:३५ च्या सुमारास झाला. हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. जेव्हा मंदिरावर हा हल्ला झाला तेव्हा मंदिराचे पुजारीही आत झोपले होते. तथापि, सुदैवाने मंदिराच्या पुजाऱ्याला कोणतीही इजा झाली नाही. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूचे लोकही जागे झाले आणि सर्वजण घाबरले.
हे ही वाचा :
हमासचे केले समर्थन; कोलंबिया विद्यापीठातील भारतीय विद्यार्थिनी अमेरिकेतून घरी परतली
‘छावा’ने रचला इतिहास, कमाईत पोहोचला तिसऱ्या क्रमांकावर
भारत यंदा 800 अब्ज डॉलरपेक्षा अधिक निर्यात करणार
पश्चिम बंगालमध्ये हिंदूं देवतांच्या मूर्तींची तोडफोड, भाजपाने व्हिडीओ केला शेअर!
पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हल्लेखोर कोण होते, त्यांचा उद्देश काय होता, या घटनेमागे कोणाचा हात आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे दोन तरुण रात्रीच्यावेळी मंदिराबाहेर उभे राहून मंदिराच्या दिशेने काहीतरी फेकतात आणि एकच स्फोट होतो. हल्लेखोरांच्या दुचाकीच्या पाठीमागे एक झेंडा देखील दिसत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी बिहारमधून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींची सध्या चौकशी सुरु आहे.