मालेगाव मधील एका दहा वर्ष जुन्या प्रकरणात न्यायालयाने एका दोषी व्यक्तीला रोज सलग २१ दिवस दोन झाडांचे वृक्षारोपण सलग २१ दिवस पाच वेळा नमाज पठण करण्याची अजब शिक्षा ठोठावली आहे. २०१० सालच्या एका प्रकरणात न्यायालयाने मालेगावमधील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी ३० वर्षीय मुस्लिम युवकाला दोषी ठरवत मशिदीच्या परिसरांत सलग २१ दिवस रोज दोन झाडे लावायला सांगून दिवसातून पाच वेळा नमाज अदा करण्याचे सांगितले आहे. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी तेजवंत सिंघ संधू यांनी रौफ खान या आरोपीला दोषी ठरवले मात्र दुसऱ्या प्रकरणातून त्याला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.
या न्यायालयाच्या निकालानंतर रौफ खान याने आपण केवळ २१ दिवस नाही तर संपूर्ण आयुष्यभर नमाज पठाण करू असे म्हंटले आहे. मोहम्मद शरीफ शेख यांनी मालेगावातील कॅम्प पोलीस स्थानकात एक तक्रार नोंदवली होती. मोहम्मद शेख त्यांच्या मित्राला क्रांती नगर भागात भेटण्यासाठी २८ एप्रिल २०१० साली गेले होते. शेख यांनी पोलिसांना सांगितले कि, त्यांनी त्यांची गाडी पार्क केली होती मात्र नंतर त्याच गाडीला रौफ खानच्या रिक्षाने धक्का दिला होता. आमच्या घराबाहेर गाडी का पार्क केली अशी विचारणा करताच रौफ खान याने मारहाण केल्याची तक्रार मालेगाव पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली. होती. न्यायालयाने या प्रकरणात चार साक्षीदारांचा जबाब नोंदवला आहे.
हे ही वाचा:
संजय राऊत यांनी महाराष्ट्रद्रोह केला आहे!
शेकापला फटका, धैर्यशील पाटील भाजपात दाखल
‘कोविड प्रकरणात जवळच्या माणसाला अटक केल्यामुळे संजय राऊत प्रचंड निराश’
याच प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने रौफ खान याला न्यायालयाने दोन झाडे मशीद परिसरात लावायला सांगण्यास आले आहेत. झाडे लावली जातात कि नाही याची पडताळणी करण्याचे आदेश न्यायालयाने कृषी अधिकाऱ्यांना दिली आहे. वकील नसरीन मेमन यांनी रौफ खान याला २१ दिवस दिवसातून पाच वेळा नमाज पठण करण्याचे आदेश याप्रकरणी न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने दोषी व्यक्तींना सुधारण्याच्या दृष्टीने दिलेला निकाल महत्वाचे आहे असे ते म्हणाले.
हि शिक्षेची जबाबदारी न्यायालयाकडून कृषी अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. शिवाय त्यांना खरोखर झाडे लावले जातात कि नाही याची नोंद ठेवली जाणार आहे.
अनोख्या शिक्षेची चर्चा
नाशिकच्या मालेगावमधील अनोख्या या शिक्षेचीच सगळीकडे चर्चा सुरु आहे. न्यायाधीशांना आरोपीला सुधारण्याच्या हेतूने ही शिक्षा दिली असल्याची चर्चा सगळीकडे सुरु आहे. आरोपीने देखील हि शिक्षा मान्य करत आयुष्यभर नमाज पठाण करणार असल्याचे म्हंटले आहे.