27 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामापुण्याहून बसचा पाठलाग करून दादरमध्ये लूट करणाऱ्या कोयता गॅंगचे सदस्य पकडले

पुण्याहून बसचा पाठलाग करून दादरमध्ये लूट करणाऱ्या कोयता गॅंगचे सदस्य पकडले

माटुंगा पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली

Google News Follow

Related

पुण्याहून बसचा पाठलाग करून मुंबईत उतरलेल्या अंगाडीया कुरिअर कंपनीच्या डिलिव्हरी बॉयवर कोयत्याने हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी सकाळी दादर येथे घडली. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी तिघांना जागेवर अटक केली असून उर्वरित तिघांना सातारा येथून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले लुटारू हे पुण्यातील नामचीन कोयता गॅंगचे सदस्य असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या या टोळीकडून दोन केटीएम बाईक्स ,कोयते जप्त करण्यात आले आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या डिलिव्हरी बॉयला उपचारासाठी सायन रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.

गौरव राजेंद्र ढमाल (२३), ओमकार संपत घोलप (२३), तेजस कृष्णाजी जाधव (२४)आणि रणजित कुडाळकर असे अटक करण्यात आलेल्या कोयता गॅंगच्या सदस्यांची नावे आहे. चौघेही पुण्यातील शिरवळ येथे राहणारे आहेत. बुधवारी रात्री सातारा येथून एक व्यापारी सोन्याची मोठी खेप घेऊन खाजगी बसने मुंबईकडे जाणार असल्याची माहिती कोयता गॅंगला मिळाली होती. या टोळीने या व्यापाऱ्याची माहिती काढून, तो कुठल्या बसने मुंबईकडे जाणार असल्याची संपूर्ण माहिती काढली, त्यानंतर या चौघांनी दोन मोटारसायकल वरून या बसचा पाठलाग सुरू केला.

ही बस गुरुवारी पहाटे दादर टिटी सर्कल येथे आली, विजय निंबाळकर हा डिलिव्हरी बॉय बसमधून उतरला व जवळच असलेल्या चहाच्या टपरीवर चहा पीत उभा असताना कोयता गॅंगचे चौघे सदस्य त्या ठिकाणी आले. त्यातील एकाने विजय निंबाळकर याच्यावर कोयत्याने हल्ला करून त्याच्या हातातील चांदी असलेली बॅग हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आरडाओरड होताच,जवळच असणाऱ्या माटुंगा पोलीस चौकीतून पोलीस धावत आले आणि नागरिकांच्या मदतीने मोटार सायकल वरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चौघांपैकी तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यातील एक जण तेथून पळून गेला.

हे ही वाचा:

‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’तून वर्षाला मिळणार तीन गॅस सिलिंडर मोफत

टीएमसी खासदारांना राज्यसभा अध्यक्षांनी फटकारले

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर

नवीन संसद भवन आणि आता सेंगोल

पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन जखमी झालेल्या निंबाळकर याला उपचारासाठी सायन रुग्णालयात पाठवण्यात आले, दरम्यान माटुंगा पोलीसानी पळून गेलेल्या चौथ्या आरोपीच्या शोध घेण्यासाठी त्याचा माग काढून सातारा येथून त्याला अटक करण्यात आली.या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली,चौथ्या आरोपीला घेऊन पोलिस पथक सातारा येथून निघाले असल्याची माहिती माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी दिली.

पोलीस सूत्रांच्या म्हणण्या नुसार अटक करण्यात आलेले हल्लेखोर हे पुण्यातील कोयता गॅंगचे सदस्य आहेत, त्यातील एक आरोपी शिक्षण घेत असून दोघे जण खाजगी कंपनीत नोकरीला आहे. या टोळीकडून दोन महागड्या मोटारसायकल आणि कोयता जप्त करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा