32 C
Mumbai
Monday, December 16, 2024
घरक्राईमनामापुण्यातील तरुणीची मुंबईत फसवणूक, पोलीस अधिकाऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा 

पुण्यातील तरुणीची मुंबईत फसवणूक, पोलीस अधिकाऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा 

आरोपी आरसीएफ पोलिस ठाण्यात अधिकारी

Google News Follow

Related

ट्रेडिंग व्यवसायात असलेल्या पुण्यातील तरुणीची मुंबईत १० लाखाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आली आहे.याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी पोलीस अधिकाऱ्यासह ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. रवींद्र गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अधिकारी याचे नाव असून गायकवाड हे आरसीएफ पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असून अद्याप गायकवाड यांना अटक करण्यात आलेली नसून त्याच्याकडे चौकशी सुरु आहे.

पुण्यात राहणारी तरुणी अनिता दैवज्ञ हि ट्रेडिंग व्यवसायात असून पुण्यात एका ट्रेडिंगच्या सेमिनार मध्ये मुंबईत राहणाऱ्या मोहसीन नावाच्या तरुणासोबत तिची ओळख झाली होती.दोघेही एकाच व्यवसायात असल्यामुळे दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. दरम्यान मोहसीन याने अनिताला १५ जुलै रोजी फोन करून १० लाख रुपये गुंतवण्यास सांगितले, पंधरा दिवसात त्याचे डबल होतील याची हमी त्याने दिल्यानंतर अनिताने तिच्या एका क्लायंटला ही योजना सांगून त्याला पैसे गुंतविण्यास तयार केले.

दरम्यान, अनिता ही गुंतवणूक करण्यासाठी दहा लाख रोकड घेऊन स्वतःच्या खाजगी मोटारीने गुरुवारी मुंबईत आली व मोहसीन याला भेटल्यानंतर दोघेही तिच्या मोटारीने फ्रीवे वरून चेंबूरकडे निघाले असता मोहसीन याने आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटार थांबविण्यास सांगितली, त्या दरम्यान साध्या वेशात एक व्यक्ती गाडीकडे आला आणि त्याने मोहसीनला बॅगमध्ये काय आहे अशी चौकशी करून तक्रारदार यांनी दिलेली दहा लाख रुपयांच्या रोकडसह मोटारीतून बाहेर येण्यास सांगितले.

त्याच दरम्यान वर्दीतील एक पोलीस शिपाई मोटारसायकल वरून जात असताना  त्याला थांबून साध्या वेशातील इसमाने मोहसीनला पोलीस शिपायाच्या मोटसायकवर बसवले व याला आरसीएफ पोलीस ठाण्यात घेऊन चला असे बोलून सदर व्यक्तीने रिक्षाने पोलीस ठाण्याकडे निघाला.

हे ही वाचा:

‘न्यूजक्लिक’ प्रकरणी ईडीची उच्च न्यायालयात धाव

शिवसेना, राष्ट्रवादीत व्हीपचा राडा, एकमेकांना पाडा

१८ वर्षांपूर्वी अंतराळ सफरीचे तिकीट काढणाऱ्याचे स्वप्न झाले साकार!

जम्मू काश्मीरचे सार्वभौमत्व भारतात संपूर्ण विलीन

तक्रारदार अनिता हि देखील रिक्षाचा पाठलाग करीत पोलीस ठाण्यात आली. तिने मोहसीनचा पोलीस ठाण्यात शोध घेत असताना तिला साध्या वेशातील तो इसम भेटला. त्याच्याकडे मोहसीन कुठे आहे अशी चौकशी केली असता गुन्ह्यातील फरार आरोपी आहे त्याला चौकशीसाठी ताब्यात  घेतले आहे. तुम्ही इकडून निघून जा नाही तर तुम्हाला देखील ताब्यात घेऊ असे बोलून या साध्या वेशातील इसमाने तक्रारदार अनिता याना जाण्यास सांगितले. मात्र तक्रारदार पोलीस ठाण्याच्या बाहेर थांबून मोहसीनची वाट पहात असताना एक रिक्षातून मोहसीन पोलीस ठाण्यातून बाहेर पडला असता त्याचा पाठलाग केला परंतु तो मिळून येत नसल्यामुळे तिने पुन्हा आरसीएफ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

आरसीएफ पोलिसांनी मोहसीनचा शोध घेऊन त्याला पोलिस ठाण्यात आणले व चौकशी करण्यात आली. मोहसीन याने आरसीएफ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्यासोबत दहा लाख रुपये लुटण्याचा कट रचला होता. या कटात आणि दोन जणांचा सहभाग असल्याचे समोर आले.

आरसीएफ पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गायकवाडसह तरुणीचा मित्र मोसीन आणि इतर दोघे असे एकूण चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून मोसीन याला अटक करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा