पुण्यातील येरवडा भागातील शास्त्रीनगर परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. गुरुवारी ३ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या दुर्घटनेत पाच कामगार गंभीर जखमी झाले होते तर या घटनेमध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. पुणे पोलिसांनी या प्रकरणी ब्ल्यू ग्रास बिझनेस पार्क कंपनीसह अहलुवालिया कन्स्ट्रक्शनवर सदोष मनुष्यवधासह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते. याच प्रकरणी आता चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे पोलिसांनी या दुर्घटने प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. सिनिअर सेफ्टी सुपरवायझर इमतियाज अबुल बरकात अन्सारी, प्रोजक्ट मॅनेजर असिस्टंट विजय धाकतोडे, लेबर कॉक्ट्रक्टर सुपरवायझर मोहम्मद आलम, प्रोजक्ट मॅनेजर मजीद खान या चौघांना अटक करण्यात आली आहे. इमारतीचा स्लॅब कोसळून पाच कामगारांचा मृत्यू झाला होता. सदोष मनुष्यवधासह विविध कलमांनुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी कामगाराने केलेल्या तक्रारीवरून बांधकाम व्यासायिकावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
सुरक्षा दलाकडून जम्मू- काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
१९९३ बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड अबू बकरला अटक
दक्षिण कोरियन कंपनी केली मास्कची ‘नाक’बंदी
मुंबईतील उद्यानाला ‘ख्वाजा गरीब नवाज’ नाव दिल्याने वाद
शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ एका मॉलचे बांधकाम रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास सुरू होते. त्या दरम्यान बेसमेंटची जाळी कोसळून हा अपघात झाला होता. या दुर्घटनेत पाच कामगार गंभीर जखमी झाले होते तर या घटनेमध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर सुमारे दोन तास सुरू असलेल्या मदत कार्यानंतर दुर्घटनेत अडकलेल्या मृत व गंभीर जखमी मजुरांना बाहेर काढण्यात आले.