पुणे रेल्वे पोलिसांच्या पथकाने एका बनावट लष्कर अधिकाऱ्याला अटक केली आहे.महत्वाचं म्हणजे, लाल किल्ल्यावरील १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला तो सुरक्षा पासशिवाय प्रवेश करून सहभागी झाला होता. अटक करण्यात आलेल्या बनावट अधिकारी नीरज विक्रम विश्वकर्मा असे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील रहिवासी आहे.
पुणे रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज विश्वकर्मा (२०) हा काल रात्री पुणे रेल्वेच्या आवारात लष्करी अधिकाऱ्याच्या गणवेशात फिरत होता.रेल्वे पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याची चौकशी केली असता, सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.त्याच्याकडे ओळखपत्र मागितले असता, त्याच्याकडे ते नव्हते.तरुणाच्या गणवेशावर नेमप्लेट, पॅरा बॅच, लेफ्टनंटची बॅच होती.जीआरपीने लष्करी गुप्तचर अधिकाऱ्यांना बोलावून त्याची चौकशी केली असता तो बनावट असल्याचे सिद्ध झाले.त्यानंतर त्याला अटक करण्यात आले.
हेही वाचा..
सेव्हन हिल्समध्ये गरीब रुग्णांना मोफत सेवा पुरवा!
धर्मांतर कराल तर सावधान… शासकीय लाभ मिळणार नाहीत
भारतातील नव्या वातावरणामुळे चित्त्यांचे मृत्यू !
लैंगिक अत्याचार करत ब्लॅकमेल करणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थ्याने केले ठार
त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यात काही संशयित फोटोदेखील सापडले आहे. या फोटोत तो लष्करी जवानांच्या सहवासात असल्याचे दिसून आलं आहे.त्याच्या मोबाईल मध्ये मिळालेल्या फोटो मध्ये तो १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यादरम्यान नवी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याला भेट दिल्याचे आढळून आले.एवढंच नाही तर नीरज विश्वकर्मा यांच्याकडे बनावट कॅन्टीन कार्ड असल्याचे आढळून आले, जे विशेषत: सेवारत किंवा सेवानिवृत्त लष्करी कर्मचाऱ्यांना देण्यात येतं. या विक्रम विश्वकर्माची तपासनी केली असता त्यांच्याकडे अनेक चिंता व्यक्त करणारे पुरावे सापडल्याने हा एकटाच होता की यांचे काही साथीदार आहेत का? बनावट लष्करी अधिकारी म्हणून ते का वावरत आहे? आणि त्यांचा कोणत्या देशविरोधी संघटनेशी संबंध आहे का? याची सध्या चौकशी केली जात आहे.पुणे पोलीस त्याचा अधिक तपास करत आहेत.