21 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामाकोयत्याचा धाक दाखवून सख्ख्या भावांनी केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

कोयत्याचा धाक दाखवून सख्ख्या भावांनी केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

पुण्यातील उरुळी कांचन परिसरातील घटना

Google News Follow

Related

पुण्यामध्ये दोन सख्ख्या भावांनीच अल्पवयीन मुलीवर सलग १५ दिवस लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. लैंगिक अत्याचार करुन मुलीला आईवडिलांना कोयत्याने मारुन टाकण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली असून घटनेविरोधात सर्वत्र भागात संताप व्यक्त केला जात आहे.याच घटनेच्या विरोधात उद्या उरळी कांचनमध्ये बंदची हाक दिली आहे.

 

पुणे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते.तसेच विद्येचे माहेरघर म्हणूनही पुण्याची ओळख आहे. मात्र, पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने भीती व्यक्त केली जात आहे.

 

तशीच एक घटना पुण्यातील उरुळी कांचन परिसरात घडली आहे. पीडित मुलीची आई मंगळवारी (११ जुलै) रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी बाहेर आली होती. यावेळी मुलगी अभ्यास करत असलेल्या खोलीच्या बाहेर आयुब दिसला. तर मुलीच्या खोलीचा दरवाजा उघडून आत पाहिल्यावर खोलीत इरफान दिसला.

हे ही वाचा:

बंद दाराआड झालेल्या गोष्टी ठाकरेंच्या आग्रहाखातर रश्मी वहिनींना सांगाव्या लागल्या

मोदी यांचा ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ पुरस्काराने सन्मान

आम्हाला फार बोलायला लावू नका, तुम्हाला पळता भुई थोडी होईल

विकृतीचा कळस; महिलेवर आठ जणांकडून सामुहिक बलात्कार

मुलीच्या आईला पाहून दोघांनीही पळ काढला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलीसांनी नराधम इरफान शेख आणि आयुब शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. याच घटनेच्या विरोधात उद्या उरळी कांचनमध्ये बंदची हाक दिली आहे.पीडित मुलीने पोलिसांच्या जबाबात सांगितले की, आरोपी इरफान शेख आणि आयुब शेख ह्या दोघांनी आईवडिलांना कोयत्याने मारुन टाकण्याची धमकी देत दोघांनी १५ दिवस लैंगिक अत्याचार केला. संबंधित घटनेचा पोलिसांनी तपास करून दोघांविरोधात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.

 

या घटनेची दखल महिला आयोगाच्या अध्याक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली आहे. त्या म्हणाल्या की, पोलिस आयुक्तांशी मी स्वतः चर्चा केली असता पीडिता व आरोपी यांची अनेक दिवसांपासून ओळख होती. CDR मध्ये हे सतत संपर्कात असल्याचे समोर आले आहे. आरोपीला अटक झाली असून POCSO ACT नुसार कडक कारवाई करण्यात येत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा