पुणे विमानतळावर बॉम्ब आणल्याची धमकी

७२ वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल

पुणे विमानतळावर बॉम्ब आणल्याची धमकी

पुणे विमानतळावर बॉम्ब आणल्याची अफवा पसरल्याने मोठी खळबळ उडाली. एका ७२ वर्षी वृद्ध प्रवाशी महिलेने ही धमकी दिल्यानंतर या महिलेवर विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीता प्रकाश कृपलानी (वय ७२, रा. दिल्ली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीता कृपलानी ही महिला विमानतळावर गुरुवार, ३ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आली. त्यावेळी या महिलेने विमानतळावरील बूथमध्ये ड्युटीवर असलेल्या पोलिसांना ‘मेरे चारों तरफ बम लगा है’ असं सांगितलं. यानंतर तेथील कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलेची झडती घेतली असता तिच्याकडे असे आक्षेपार्ह काहीचं सापडले नाही. त्यामुळे ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी महिलेविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ५०५ आणि १८२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळावर सुरक्षा तपासादरम्यान वेळ लागत असल्याने ही महिला वैतागली होती. त्यामुळे कंटाळलेल्या महिलेने पोलिसांना आपल्याकडे बॉम्ब असल्याचं सांगितलं. पुणे ते दिल्ली असा प्रवास ही महिला करणार होती. मात्र, तिने पसरवलेल्या अफवेनंतर या महिलेवर गुन्हा दाखल झाला असून तिला कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

मुंबईत समुद्र किनाऱ्यावर आढळले दोघा भावांचे मृतदेह

इस्रायलचे ‘स्पाईक’ वाढवणार भारतीय वायूदलाची ताकद!

जम्मू काश्मीरचा बेपत्ता जवान अखेर सापडला

लवासाचा सौदा हा दृश्यम् पार्ट थ्री??

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ५ आणि ६ ऑगस्ट रोजी पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून या अफवेमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पुणे शहरात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री पुण्यात असल्यामुळे कोणताची अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

Exit mobile version