पुणे अपघाताप्रकारणी नवी माहिती समोर आली असून या प्रकरणाला रोज नव्याने वळण मिळत असल्याचे दिसून येत आहे. अल्पवयीन आरोपी वेदांत याचे ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक माहिती समोर आणली आहे.
अपघातानंतर आरोपीची सकाळच्या वेळेत पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली होती. त्यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. ससूनमध्ये त्यावेळी ड्युटीवर असलेले सीएमओ डॉ. श्रीहरी हळनोर आणि डॉ. अजय तावरे यांनी हे ब्लड सॅम्पलच बदलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे हा ब्लड रिपोर्ट बदलला गेला.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खुलासा करत म्हटले आहे की, “१९ तारखेला ११ वाजता अल्पवयीन आरोपीचे सूसन हॉस्पिटलमध्ये ब्लड सॅम्पल कलेक्ट करण्यात आले होते. आरोपीचे जे ब्लड सॅम्पल घेतले, ते त्यांनी कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले. त्यानंतर दुसऱ्याच व्यक्तीचे ब्लड सॅम्पल घेऊन डॉक्टरने सील केले आणि त्यावर आरोपीचे नाव लिहून फॉरेन्सिकला पाठवून दिले. डॉ. श्रीहरी हळनोर तिथे सीएमओ होते. त्यांनी हे सर्व ब्लड सॅम्पल बदलले. डॉ. अजय तावरे हे विभाग प्रमुख असून त्यांचाही सहभाग यामध्ये होता,” अशी धक्कादायक माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
हे ही वाचा:
कोलकाता संघावर बक्षिसांचा वर्षाव
फिरकीपटूंची भेदक गोलंदाजी; गंभीर- नारायणचा मास्टरस्ट्रोक
मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार
पुणे अपघात: वेदांतच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल करणाऱ्या ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक
ते पुढे असेही म्हणाले की, “त्याच रात्री औंधमध्ये दुसऱ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आरोपीचे आणखी एक ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते. डीएनए मॅचिंग हा त्यामागे उद्देश होता. आरोपीच्या वडिलांचे सुद्धा सॅम्पल घेण्यात आले होते. औंधमधील रुग्णालयात आरोपीची सॅम्पल वडिलांच्या नमुन्यासोबत मॅच झाली. सूसनची सॅम्पल मॅच होत नव्हती. त्यावरुन काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले होते,” अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली. ससूनमधील सर्व सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येणार असल्याचे पुणे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.