पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर

अल्पवयीन मुलाचा ताबा आत्याकडे देणार

पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर

पुण्यात कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवत दोन जणांना चिरडल्याची घटना घडली होती. पुण्यातील नामांकित उद्योगपतीचा मुलगा ही गाडी चालवत होता. पुढे या प्रकरणात त्याच्यासह संपूर्ण कुटुंब अडचणीत सापडले आहे. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. पुण्याच्या कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीला आज अखेर जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला आहे.

अल्पवयीन आरोपी वेदांतच्या आत्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत अल्पवयीन आरोपीला बेकायदेशीरपणे कोठडीत ठेवल्याचा आरोप त्याच्या आत्याने केला होता. दरम्यान, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला होता आणि निर्णय राखून ठेवला होता. अखेर उच्च न्यायालयाकडून या प्रकरणी निकाल देण्यात आला आहे. अल्पवयीन आरोपीला याप्रकरणी जामीन मंजूर केला असून त्यामुळे या तरुणाची बालसुधार गृहातून सुटका होणार आहे.

या प्रकरणी न्यायालयाने निरीक्षण नोंदवत म्हटलं आहे की, पहिल्यांदा जामीन दिल्यानंतर पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर आहे. तसेच अल्पवयीन आरोपीचे आई-वडील सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे त्याचा ताबा आता त्याच्या आत्याकडे देण्यात येणार असल्याचं न्यायलयाने स्पष्ट केलं आहे.

हे ही वाचा:

लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला विरुद्ध के.सुरेश मैदानात!

बिर्यानीत लेग पीस नसल्याने लग्नात झाला राडा !

“आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसला राज्यघटनेवर प्रेम व्यक्त करण्याचा अधिकार नाही”

ड्रग्स सेवन करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात!

कल्याणीनगरमध्ये झालेल्या या अपघातात बाईकवर असलेल्या तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता. या दोघांच्या आई-वडिलांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटत मुख्यमंत्र्यांनी संबंधित घटनेचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं.

Exit mobile version