एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायकी घटना पुण्यातून समोर आली आहे. या क्रूर घटनेने पुणे शहर हादरून गेले आहे. मंगळवार, १२ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. एकतर्फी प्रेमातून एका १४ वर्षांच्या कबड्डीपटू मुलीवर कोयत्याने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. ऐन नवरात्रीत घडलेल्या घटनेमुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पुण्यातील बिबडेवाडी परिसरातील यश लॉन्स या भागात ही घटना घडली आहे. क्षितिजा अनंत व्यवहारे असे मृत मुलीचे नाव आहे. क्षितिजा कबड्डीपटू असून ती कबड्डीचा सराव करण्यासाठी नियमितपणे बिबवेवाडीतील यश लॉन्स परिसरात जात असे. हीच संधी साधून तीन नराधमांनी तिच्यावर हल्ला चढवून तिची क्रूरपणे हत्या केली. क्षितिजाचा खून केल्यावर हे तीनही आरोपी फरार झाले आहेत. त्यातला एक आरोपी तिच्या नात्यातला असल्याचेही समजते. तर या हल्लेखोरांकडे पिस्तूल असल्याचीही माहिती पुढे येत आहे.
हे ही वाचा:
अतिरेकी संघटना त्यांचे पालनपोषण करणाऱ्यांनाच नंतर पछाडतात!
खडसेंच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार
मुंबई सायबर विभागाचा ई मेल हॅक; ‘या’ तीन ठिकाणी हॅकर्सचे केंद्र
अमित शहांनी केली काश्मीरमध्ये नव्या युगाची सुरुवात!
अचानक घडलेल्या या या घटनेने बिबवेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली. तिच्यासोबत कबड्डीचा सराव करणाऱ्या इतर मुली घाबरून गेल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्षितिजाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
टाईप करतानाही येतो अंगावर काटा
पुण्यात घडलेल्या या घटनेवरून भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ट्विटरवर चित्रा वाघ यांनी आपला आक्रोश व्यक्त केला असून, ‘टाईप करतांनाही अंगावर काटा येतो’ असे त्यांनी म्हटले आहे. तर कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर आहे, पोलिस कायदे फक्त कागदावर आहेत, महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडत आहेत, यांच्यासाठी सरकार कधी महाराष्ट्र बंद करताय? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.
अतिशय भयानक 😳
काय चाललयं पुण्यात
कोयत्याने वार करून खून
टाईप करतांनाही अंगावर काटा येतोय काय भोगलं असेल तीने
कायदा सुव्यवस्था वार्यावर
पोलिस कायदे कागदावर
महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडताहेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्रबंद ?? @CMOMaharashtra pic.twitter.com/vXLF08U5jY— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 12, 2021