‘ब्राऊनी केक’ प्रकरणी सायकॉलॉजिस्ट अटकेत

‘ब्राऊनी केक’ प्रकरणी सायकॉलॉजिस्ट अटकेत

केक मध्ये ड्रग्स टाकून विकत असल्याचे उघड

मुंबईच्या माझगाव परिसरातून अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) एका सायकॉलॉजिस्टला अटक केली आहे. या सायकॉलॉजिस्टकडून एनसीबीने १० किलो ‘ब्राउनी केक’ जप्त केला आहे. हा केक सामान्य केक नसून या केकमध्ये अमली पदार्थ टाकून तयार केलेले हे केक आहेत. त्याला हॅश ब्राउनी असे नाव देण्यात आले आहे. हा केक मुंबईत होणाऱ्या पार्ट्यांमध्ये पुरवला जायचा, अशी माहिती एनसीबीचे अधिकारी यांनी दिली आहे. या सायकॉलॉजिस्टच्या घरातून एनसीबीने ३२०ग्राम अमली पदार्थसह पावणे दोन लाख रुपयाची रोकड देखील जप्त केली आली आहे.

रहमीन चारानिया असे या सायकॉलिजिस्टचे नाव आहे. दक्षिण मुंबईतील एका रुग्णालयात सायकॉलिजिस्ट म्हणून नोकरी करणारा रहमिन याने घरातच छोटी बेकरी तयार करून विविध प्रकारचे केक तयार करीत होता. केकमध्ये तो हशिश, गांजा,चरस आणि अफू या सारख्या अमली पदार्थचे मिश्रण करून ब्राऊन रंगाचा ब्राउनी केकी तयार करीत होता. मुंबईत होणाऱ्या पार्ट्यामध्ये या केकची तो विक्री करीत होता, अशी माहिती समोर आली आहे. एनसीबीने आदल्या दिवशी क्रॉफर्ड मार्केट येथून रमजान शेख याला हशिश या अमली पदर्थासह अटक केल्यानंतर या सायकोलॉस्टचे बिंग फुटले आणि तो एनसीबीच्या हाती लागला.

हे ही वाचा:

रोल्स रॉयस मधून फिरणाऱ्या शिवसेना नेत्यावर ३५ हजारच्या वीज चोरीचा गुन्हा

‘तुम्ही नव्या भारताचे प्रतिबिंब’…मोदींनी साधला ऑलिम्पिक खेळाडूंशी संवाद

खेळ पुरे, आता रेल सुरू करा!

प्रसादनी उडवली हिंदूविरोधी ट्विटर हँडलची दांडी

गेल्या महिन्यातही एनसीबीने अशीच कारवाई करत बेकरीतून अशा केकची विक्री करणाऱ्यांना अटक केली होती. मालाड पश्चिमेतील ऑर्लेम परिसरात एका बेकरीमध्ये गांजा युक्त ब्राऊनी केकचे पॉट तयार करून त्याची डिलिव्हरी हायप्रोफाइल सोसायट्यामध्ये केली जात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीच्या पथकाने एका महिलेसह एका इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेले १० ब्राऊनी केकचे ८३० ग्रॅमचे १० पॉट ताब्यात घेऊन तपासले असता त्यात १६० ग्रॅम उच्च दर्जाचा गांजा हा अमली पदार्थ मिळून आला आहे.

Exit mobile version