परमबीर यांच्यासह २५ जणांना निलंबित करण्याचा प्रस्तावच फेटाळला

परमबीर यांच्यासह २५ जणांना निलंबित करण्याचा प्रस्तावच फेटाळला

मुंबईत मरीन ड्राइव्ह, आंबोली, ठाण्यात ठाणे नगर, कोपरी आणि नौपाडा अश्या एकूण ५ पोलीस ठाण्यात परमबीर सिंग यांच्यासह ठाणे मुंबईतील पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी तसेच एसीपी आणि पोलीस निरीक्षक दर्जाच्या २५ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत.

मुंबई तसेच ठाण्यामध्ये खंडणीचे गुन्हे दाखल झालेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह इतर पोलीस अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्याच्या गृह विभागाला पाठवला आहे. पंधरा दिवसांपूर्वीच यासंदर्भातील सर्व माहिती पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी गृहविभागाकडे पाठवली होती. परंतु निलंबित करण्याचा प्रस्ताव गृहविभागाने थेट फेटाळून लावलेला आहे.

पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या बदल्यामध्ये गुन्हे दाखल झालेल्या तीन पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश असून, पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकरी यांच्या मुंबई,ठाणे बाहेर तसेच साईड ब्रँचला बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये एका महिला अधिकारीचा समावेश आहे.

हे ही वाचा:

किरीट सोमैय्यांचा कोल्हापूर दौरा आज सुरु, काय होणार कागलमध्ये?

जर्मन निवडणुकीनंतर चित्र अस्पष्टच?

धक्कादायक! … म्हणून तो देणार होता बायकोचा बळी!

‘जनाब राऊत एमआयएम की मोहब्बत कोण आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे’

१५ दिवस उलटूनही अजूनही निलंबनाच्या प्रस्तावावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. पोलिस महासंचालकांचा प्रस्ताव गृहविभागाने फेटाळून लावलेला आहे. त्याबाबत चौकशीशिवाय कोणतीही कारवाई करणे योग्य नसल्याचे कारण आता पुढे करण्यात आलेले आहे. परमबीर सिंह यांना निलंबित करण्याचे अधिकार केवळ मुख्यमंत्र्यांचे आहेत. बाकी प्रत्येकी चार उपायुक्त दर्जाचे सहायक व आयुक्त दर्जाचे अधिकारी व अन्य निरीक्षक, एपीआय आदींचा समावेश आहे.

Exit mobile version