आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागील ईडीचा फेरा काही सुटायला तयार नाही. एकनाथ शिंदे गटातील आमदार सरनाईक यांच्या मागे पुन्हा एकदा ईडीचा ससेमिरा मागे लागल्याची चर्चा आहे. एनएसईएल घोटाळा प्रकरणी ईडीकडून प्रताप सरनाईक यांच्या यांची ११ कोटींच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाविकासआघाडी सरकारच्या काळात शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात किरीट सोमय्या यांनी सत्ययाने पाठपुरावा केला होता. त्याच दरम्यान आमदार सरनाईक यांच्या टॉप्स सिक्युरिटी घोटाळ्या संदर्भात ईडीने कारवाई केली होती. ईडीने २४ नोव्हेंबर २०२० रोजी प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालय आणि हॉटेलसह १० ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यावेळी सरनाईक हे भारताबाहेर गेले होते. सरनाईक यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेस यांच्याही घर आणि कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. १७५ कोटींच्या मनी लाँड्रिंग घोटाळ्याप्रकरणी आमदार प्रताप सरनाईक यांना अंमलबजावणी संचालनालयाने आतापर्यंत ईडी कार्यालयात बोलावले आहे.
हे ही वाचा:
भारताने बांगलादेशला नमवले आणि पाकिस्तानची केली कोंडी
नाशिकमध्ये देशातील पहिली खासगी बाजार समिती
घरी बसून महाराष्ट्र पिंजून काढतायत उद्धव ठाकरे….
दादर, ठाणे रेल्वे स्टेशनवरील ‘स्टॉल’ उचलणार
सरनाईक यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, टॉप्स समूहाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची १७५ कोटी रुपयांची फसवणूक केली. एमएमआरडीएच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याचे कंत्राट टॉप्स ग्रुपला मिळाले आहे. हे कंत्राट मिळवून देण्यासाठी नंदाचा जुना मित्र सरनाईक याने त्याला मदत केल्याचा आरोप आहे. सरनाईक यांच्या कंपन्यांनी टॉप्स ग्रुपच्या माध्यमातून परदेशात पैसे पाठवल्याचाही संशय आहे. यूकेमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे आणि मॉरिशसस्थित ट्रस्टमुळे नंदाही संशयाच्या भोवऱ्यात आहेत, मात्र सरनाईक यांनी कोणताही गैरव्यवहार झाल्याचा इन्कार केला आहे.