हिजबुल मुजाहुद्दीनच्या कमांडरची बारामुल्लाहमध्ये मालमत्ता जप्त

एनआयएची कारवाई

हिजबुल मुजाहुद्दीनच्या कमांडरची बारामुल्लाहमध्ये मालमत्ता जप्त

बारामुल्ला जिल्ह्यातील यंबरजलवरी शिवा डांगरपोरा सोपोर भागातील  बासित रेशी हा एक रहिवासी आहे.  राष्ट्रीय तपास यंत्रणेने तीन मार्च रोजी बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागांतील रहिवासी असून , एनआयएच्या म्हणण्यानुसार सध्या तो पाकिस्तानांत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने तीन मार्च रोजी बारामुल्ला जिल्ह्यातल्या सोपोर भागातील हिजबुल मुजाहिद्दीन कमांडर बासित रेशीची मालमत्ता जप्त केली आहे. गृह मंत्रालयाने बासित रेशीला यूएपीए अंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर हि कारवाई केली असून दहशतवाद्यांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हि कठोर कारवाई केली आहे.

गृहमंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाणे बासित अहमद रेशी हा हिजबुल मुजाहिद्दीनचा सदस्य आहे. जम्मू काश्मीरमध्ये हिंसक कारवाया आखून त्या करण्यांत त्याचा हात होता. एनआयएचा असा दावा आहे कि, १८ ऑगस्ट २०१५ रोजी तुजार शेरिफमधील पोलीस गार्ड पोस्टवरती हल्ला करण्याची योजना आखली आणि ती राबवण्यात आली आहे. ज्या मध्ये एक नागरिक आणि एक पोलीस कर्मचारी पण ठार झाला होता.

एनआयए च्या म्हणण्यानुसार रेशी हा बारामुल्ला जिल्ह्यातील यंबरजलवारी शिव डांगरपोरा सोपोर भागातील रहिवासी असून तो सध्या पाकिस्तानांत वास्तव्यास आहे. एनआयएने   श्रीनगरच्या नौहट्टा भागातल्या मुश्ताक अहमद जरगर उर्फ लतराम यांची मालमत्ता जप्त केली त्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी हि कारवाई केली आहे.

Exit mobile version