तेलंगणातील नागरकुर्नूल जिल्ह्यात मंगळवारी पोलिसांनी एका ‘सिरियल किलर’ अटक केली. रामती सत्यनारायण असे ‘सिरियल किलरचे नाव आहे.तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील ११ जणांच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले की, हैदराबादपासून सुमारे १३० किमी अंतरावर असलेल्या नागरकुर्नूल येथील रहिवासी असलेला आरोपी रामती सत्यनारायण (४७) याने लपवलेला खजिना उघड करण्याचे लोकांना आश्वासन देत निरपराध ११ जणांची हत्या केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या गुन्ह्याची पद्धत अशी होती की, पूजा अर्चा करून जमिनीतून खजिना बाहेर काढतो अशी बतावणी करून लोकांना आपल्या जाळयात ओढून त्यांची हत्या करत असे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामती सत्यनारायण हा रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करत असे.अनके व्यक्तींकडून पैसे घेऊन त्यांना जमीन विकत असे किंवा त्यांना पैसे देऊन त्यांची जमीन विकत घेत असे.आरोपीच्या जाळयात अडकलेल्या व्यक्तीला तो एका निर्जन ठिकाणी घेऊन जात असे आणि त्या व्यक्तीला तो अॅसिड किंवा काही अज्ञात विष प्यायला लावत असे.जेव्हा ती व्यक्ती बेशुद्ध पडते तेव्हा आरोपी त्याच्या डोक्यावर दगडाने अथवा इतर कोणत्याही जड वस्तूने मारहाण करत त्याची हत्या करत असे, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी २०२० पासून या प्रकारच्या गुन्ह्यात सामील होता आणि तो पोलिसांच्या जाळ्यातून पळून जाण्यात यशस्वी झाला होता.आरोपीने आतापर्यंत ११ जणांची हत्या केली, ज्यामध्ये महिलांही समावेश आहे.सध्या, त्याची भूमिका तेलगू राज्ये (तेलंगणा आणि आंध्र प्रदेश) आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील आठ प्रकरणांमध्ये ओळखली गेली आहे.
दरम्यान, २६ नोव्हेंबर रोजी एका महिलेने तक्रार केली की, तिचा पती वेंकटेश हा आरोपी सत्यनारायण याला भेटण्यासाठी नागरकुर्नूलला निघाला होता.परंतु पाच दिवस उलटूनही तो परतला नाही.महिलेच्या तक्रारीनुसार, पोलिस ठाण्यात जाण्यापूर्वी तक्रारदार महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आरोपी सत्यनारायण याच्याशी भेट घेऊन वेंकटेश याच्याबद्दल माहिती विचारली.मात्र, त्याने काहीच उत्तर दिले नाही.
हे ही वाचा:
कांद्यासह इतर उत्पादनांच्या निर्यात बंदीचे सीतारामन यांच्याकडून समर्थन
संसदेवरील हल्ल्याला २२ वर्षे झाली; त्याचदिवशी संसदेत शिरले दोन घुसखोर
गाझामधील तत्काळ युद्धविरामाच्या ठरावाच्या बाजूने भारत
जम्मू काश्मीरमध्ये बांधला जातोय दहशतवाद्यांसाठी भलामोठा तुरुंग
नागरकुर्नूलमध्ये तपास करणाऱ्या एका पोलिस उपनिरीक्षकाला आरोपी सत्यनारायणाचे वर्तन संशयास्पद वाटले. डीआयजी एलएस चौहान यांच्या म्हणण्यानुसार, नागरकुरनूलमध्ये मालमत्ता व्यवसायात गुंतलेला आरोपी वनौषधीचा व्यवसाय करणारा होता आणि त्याला खजिना शोधण्याची सवय होती. गुप्त खजिना शोधण्याच्या त्याच्या सरावाबद्दल त्याने आपल्या व्यावसायिक मित्रांना सांगितले होते.मूळचा वाणपार्टी येथील राहणार व्यंकटेश याला आरोपीची माहिती मिळाली.व्यंकटेशची कोल्लापूरमध्ये जमीन आहे.लपविलेल्या खजिन्याचा शोध घेण्यासाठी व्यंकटेशने सत्यनारायणाची मदत मागितली.आरोपीने त्याची विनंती मान्य करत व्यंकटेशकडून १० लाख रुपये घेतले. मात्र खजिन्याचा शोध घेताना केवळ व्यंकटेशच उपस्थित राहील अशी अट आरोपीने घातली.
ठरल्यानुसार खजिन्याचा शोध घेण्यासाठी दोघे व्यंकटेशच्या जमिनीजवळ गेले.खजिन्याचा शोध घेत असताना आरोपीने व्यंकटेशला सांगितले की, खजिना मिळेल परंतु त्यासाठी तीन गर्भवती महिलांचा बळी द्यावा लागेल.मात्र, व्यंकटेशने आरोपीला नकार दिला.जेव्हा व्यंकटेशने आरोपीला नकार देत आपल्या १० लाख रक्कम परतवण्याची मागणी केली तेव्हा या घटनेला प्राणघातक वळण मिळाले.
आरोपी सत्यनारायणने ४ डिसेंबर रोजी व्यंकटेशला नागरकुर्नूल येथे आणले आणि जबरदस्तीने त्याला एका वेगळ्या ठिकाणी नेले.आरोपीने व्यंकटेशला पवित्र पाणी असल्याचे सांगून काही विषारी औषधी वनस्पती प्यायला लावले.आरोपीने व्यंकटेशला पूजेच्या बहाण्याने एका टेकडीवर नेले.व्यंकटेश बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीने त्याच्या तोंडात अॅसिड ओतले आणि त्याची हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.आरोपी रामती सत्यनारायण याला अटक केली असून पुढील तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.