शिवलिंगाबद्दलची आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर प्राध्यापकाला अटक

शिवलिंगाबद्दलची आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर प्राध्यापकाला अटक

देशात सध्या ज्ञानवापीचा मुद्दा चर्चेत असताना वाराणसीच्या या ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आल्यानंतर त्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणं एका प्राध्यापकाला चांगलंच भोवलं आहे. या प्रकरणी सायबर सेलमध्ये तक्रार करण्यात आली असून दिल्ली पोलिसांनी या प्राध्यापकाला शुक्रवार, २० मे रोजी अटक केली आहे.

दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजमधील प्राध्यापक रतन लाल यांनी ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगाचे वादग्रस्त छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने केलेल्या या पोस्टविरोधात एका वकिलाने उत्तर जिल्ह्यातील सायबर सेलमध्ये एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणी शुक्रवारी सायंकाळी उशिरा प्राध्यापक रतन लाल यांना अटक करण्यात आली आहे. प्राध्यापक रतन लाल हे हिंदू महाविद्यालयात इतिहास विभागाचे प्राध्यापक आहेत.

हे ही वाचा:

२०२० चे प्रकरण उकरून काढत, केतकी चितळेंवर कारवाई

मुंबई विमानतळावर मुंबई- बंगळुरू विमानाचे आपत्कालीन लॅन्डिंग

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला

सध्या ज्ञानवापी प्रकरणात वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांची बदली करण्यात आली आहे. या खटल्याची गुंतागुंत लक्षात घेऊन ते अधिक अनुभवी न्यायाधीशांकडे पाठवले जात आहे, असे हा आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. तसेच जिल्हा सत्र न्यायालयानेच निकाल द्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Exit mobile version