मौलाना आझाद कॉलेजमधील इंग्रजी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. राजन शिंदे यांचा राहत्या घरी खून करण्यात आला होता. या प्रकरणातील मारेकऱ्याला शोधण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. तब्बल आठ दिवसांनंतर संबंधित प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्या आरोपीने ज्या कारणासाठी ही हत्या केली ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.
मौलाना आझाद कॉलेजमधील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. राजन शिंदे यांच्या खुनासाठी वापरण्यात आलेले शस्त्र पोलिसांच्या हाती लागले आहे. एका विहिरीत या सगळ्या वस्तू दडविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. यात एक डंबेल, स्वयंपाक घरातील चाकू आणि टॉवेल या वस्तूंचा समावेश आहे. त्यानंतर या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. मारेकरी हा गेले नऊ महिन्यांपासून शिंदे यांच्या हत्येचा कट रचत होता, असे समोर आले आहे. त्या मुलाला हे प्राध्यापक ढ म्हणत असल्यामुळे राग येऊन त्याने हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे.
हे ही वाचा:
‘उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव बुडवले’
काय आहे इस्रायमधल्या ‘मायबोली’ मराठी मासिकाची कथा?
ठाकरे सरकार म्हणजे, ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’
हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज ठाकरे जाणार अयोध्येला
प्राध्यापक डॉ. राजन शिंदे यांच्या डोक्यात वार करून नंतर गळा, हाताच्या नसा कापून ११ ऑक्टोबर रोजी त्यांचा खून करण्यात आला होता. या खुनानंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत याचा तपास पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्त यांनी स्वतःकडे घेतला होता. त्यांनी तपासासाठी विविध पथके तयार करून तांत्रिक पुरावे हस्तगत केले.
दरम्यान एका संशयिताने खुनासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे घराजवळच्या विहिरीत टाकल्याची माहिती दिली. त्यानंतर तब्बल तीन दिवस विहिरीतले पाणी आणि गाळ काढून विहिरीतली शस्त्रे हस्तगत करण्यात आली. त्यामध्ये एक सुमारे पाच किलोचे डंबेल, स्वयंपाक घरातील चाकू आणि रक्त पुसलेले टॉवेल याचा समावेश आहे. शस्त्र हाती येताच पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.