माफी मागा नाहीतर ‘मुंबई सागा’वर कायदेशीर कारवाई

माफी मागा नाहीतर ‘मुंबई सागा’वर कायदेशीर कारवाई

माफी मागा नाहीतर ‘मुंबई सागा’वर कायदेशीर कारवाई

‘मुंबई सागा’ या चित्रपटामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केलेल्या बदनामीप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक महेश भिंगार्डे यांनी पाठवलेल्या मानहानीच्या नोटिशीवर सुपर कॅसेट लिमिटेड यांच्या वकिलांमार्फत उत्तर पाठवण्यात आले, मात्र त्यांनी या बदनामीप्रकरणी माफी मागितलेली नाही किंवा त्यातील आक्षेपार्ह भाग वगळण्याचेही कोणते आश्वासन दिलेले नाही.

याबाबत भिंगार्डे यांचे वकील प्रकाश सालसिंगीकर यांचे निर्मात्यांच्या या उत्तराबद्दल म्हणणे आहे की, हा सिनेमा पूर्णपणे व्हाईट फीदर फिल्म निर्मित आहे. सदर चित्रपटाच्या प्रॉडक्शनमध्ये सुपर कॅसेट्स यांचा कुठलाही सहभाग नाही. चित्रपटाचे निर्देशक संजय गुप्ता व रॉबिन भट असून संवादलेखन विशाल वैभव यांनी केले आहे, असे सांगून त्यांनी स्वतःची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी ही जबाबदारी अन्य लोकांवर ढकललेली आहे.

हे ही वाचा:

दोन दिवसांचे अधिवेशन ठेवून सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळले

मोदी सरकारकडून हिंगोली जिल्ह्याला ७० कोटी

‘देशभक्ती’ हा डॉ.हेडगेवारांचा स्थायीभाव : भैय्याजी जोशी

परमबीर सिंग यांना ५ हजारांचा दंड

या नोटिशीमध्ये ‘मुंबई सागा’च्या निर्मात्यांनी म्हटले आहे की, आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आदर करीत असून ओटीटी प्लॅटफॉर्मला सदर विवादित इमेज अस्पष्ट (Blurr ) करण्यासाठी निर्देश दिले आहेत. असे असले तरी कुठल्याही प्रकारची माफी त्यांनी या जबाबात मागितलेली नाही.

या चित्रपटामधील ज्या प्रसंगाबद्दल आक्षेप आहे, त्याचे वर्णन करत ही बाब चित्रपट निर्मात्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. भिंगार्डे यांनी जो आक्षेप नोंदविला आहे तो असा आहे की, हा चित्रपट वास्तवात घडलेल्या घटनांवर आधारित आहे, असे या चित्रपटाच्या प्रारंभी दाखविण्यात आले आहे. या चित्रपटात ९०च्या दशकातील बदलत्या मुंबईचे चित्रण करण्यात आले आहे. त्यातील अभिनेता जॉन अब्राहम आणि इतरांमधील संवादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख अप्रत्यक्षपणे येतो. शाखा आणि सेना असे शब्द त्यात वापरले जातात. शिवाय, स्वयंसेवकांचे हाती दंड धरलेले, प्रणाम करतानाचे छायाचित्रही त्यात दिसते. ‘भाऊ की सेना’ असा शब्दप्रयोग करताना हे छायाचित्र दाखविण्यात येते. हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. हे छायाचित्र दाखवताना ते अस्पष्टही करण्यात आलेले नाही. मुंबई पोलिसांमध्ये भाऊ या पात्राकडून त्याच्या सेनेतील लोकांची भर्ती केली जाते, असे नमूद केले आहे. भाऊ नामक व्यक्ती मुंबई पोलिसांवर नियंत्रण ठेवते असाही त्यात उल्लेख आहे. एकूणच भाऊच्या सेनेतील लोक हे पोलिस दल नियंत्रित करत आहेत, असे दाखविण्याचा प्रयत्न आहे. भिंगार्डे यांनी या गोष्टींना आक्षेप घेतला आहे.

भिंगार्डे यांचे वकील सालसिंगीकर यांनी म्हटले आहे की, त्यात दाखविलेल्या फोटोंविरोधात मानहानीची नोटीस बजावण्यात आली. त्यावर त्यांनी उत्तर पाठवले की, ओटीटीला आम्ही ते छायाचित्र अस्पष्ट करायला सांगतो आहोत. पण तसे त्यांनी केलेले नाही शिवाय माफीही मागितलेली नाही. आम्ही जी नोटीस पाठवलेली त्याला त्यांनी उत्तर दिले. पण आमची मागणी आहे की, त्यांनी माफी मागायला हवी. तो भाग डीलिट करायला हवा. तसे न केल्यास आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करू.

Exit mobile version