वाझेच्या हाकलपट्टीची प्रक्रिया सुरु

वाझेच्या हाकलपट्टीची प्रक्रिया सुरु

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या हकालपट्टीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या आधी निलंबित असणाऱ्या सचिन वाझेला गेल्या वर्षी कोविडचे कारण पुढे करत त्याला पुन्हा पोलीस सेवेत घेण्यात आले होते. पण आता कोविडच्या या दुसऱ्या लाटेत वाझे याला पोलीस सेवेतून हद्दपार करण्यासाठी प्रक्रिया सुरु झालेली आहे.

अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण या दोन्ही प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे हा मुख्य आरोपी आहे. वाझे ह्याला मार्च माहिन्यात १३ तारखेला एनआयएने अटक केली असून सध्या तो तळेगाव येथील जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. वाझेचे हे सगळे कारनामे बघता त्याला काढून टाकण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानी मुलीला पालकांनीच दिली खुनाची धमकी…वाचा नेमके काय घडले

मदरशांमधील मुलांचे मौलानानेच केले लैंगिक शोषण

मुख्यमंत्र्यांचे आज पुन्हा ‘फेसबुक लाईव्ह’, लॉकडाऊनची घोषणा करणार?

दलित भिकारी नाही, तर दलित शिकारी आहेत

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीसांच्या विशेष पथकाने दहशतवाद विरोधी पथकाला एक पत्र लिहून मनसुख हिरेन केसशी संबंधित काही कागदपत्रांची मागणी केली होती. कारण एनआयएच्या आधी या केसवर दहशतवाद विरोधी पथक काम करत होते. या दस्तैवजांमध्ये मनसुख हिरेन प्रकरणातील एफआयआर आणि मनसुखच्या बायकोचा जबाब यांचा समावेश आहे.

एनआयए कडूनही अशाच प्रकारची माहिती मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने मागवली आहे. हे सर्व दस्तैवज आल्यानंतर वाझेला काढून टाकण्यासाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे आणि नंतरच त्याबद्दलचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या निलंबित असणारा आणि ज्याने संपूर्ण पोलीस खात्याची पत खाली घालवली अशा सचिन वाझेबद्दल सरकार नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Exit mobile version