हिरेन यांच्या मृत्युचा तपास एटीएसकडे

हिरेन यांच्या मृत्युचा तपास एटीएसकडे

ऍंटिलीया समोरील बाँब केस आता नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सी (एनआयए)कडे सोपवण्यात आली आहे. एनआयए स्वतःकडे या बाबतीतील खटला नोंदवून घेत आहे.

हे ही वाचा:

“अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही”

मात्र तरीही मुकेश हिरेन यांच्या संशयित मृत्युचा तपास अजूनही दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) आहे. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, मुकेश हिरेन यांच्या मृत्युचा तपास एटीएस करणार आहे, तर बाँबच्या तपासाची सुत्रे एनआयएकडे सोपवली गेली आहेत.

एटीएसने रविवारी हिरेन यांच्या मृत्युच्या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. ऍंटिलियाच्या समोर सापडलेल्या एसयुव्हीचे मालक हिरेन हे होते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हिरेन यांच्या पत्नीने एफआयआर दाखल केला आहे. अज्ञाताविरोधात दाखल करण्यात आलेल्या या एफआयआरमध्ये भारतीय दंडविधान संविधानातील ३०२ (हत्या), २०१ (पुरावे नष्ट करणे), ३४ (संयुक्त हेतू), १२०ब (गुन्हेगारी षड्यंत्र) या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घोषित केले, की ऍंटिलीया येथे सापडलेल्या स्फोटकांच्या तपासाची केस आणि हिरेन यांच्या मृत्युची केस दोन्ही एटीएसकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत.

ऍंटिलिया येथे सापडलेल्या स्फोटकांच्या गाडीच्या केसमध्ये हिरेन ही महत्त्वाची कडी मानली जात होती. त्यांचा मृतदेह रेतीबंदर खाडी येथे सापडल्याने खळबळ उडाली होती. हिरेन यांच्या परिवारानुसार ते गुरूवारी त्यांच्या दुकानातून निघाले होते, परंतु ते घरी पोहोचले नाहीत. यासंदर्भात त्यांनी दुसऱ्या दिवशी ठाण्याच्या नौपाडा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली होती.

Exit mobile version