31 C
Mumbai
Sunday, November 3, 2024
घरक्राईमनामामुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता

मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता

दोषी ठरवण्यासाठी एनआयएच्या तयारीला वेग

Google News Follow

Related

२००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा दोषी तहव्वूर राणा याच्या भारतात प्रत्यार्पणाच्या वाढत्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास संस्थेने तयारी सुरू केली आहे. एनआयएने राणाला विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्या आधारे ठोस पुराव्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. या द्वारे न्यायालयात आरोपीला कोंडीत पकडणे शक्य होऊ शकेल.

मुंबई हल्ल्याप्रकरणी राणाच्या भारताकडे प्रत्यार्पणाच्या अर्जावर सुनावणी करण्याचा निर्णय अमेरिकन न्यायालयाने घेतला आहे.२० मे रोजी अर्ज निकाली निघण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा नागरिक असलेल्या राणा (६२) याचे भारताकडे प्रत्यार्पण केले जाऊ शकते, असे संकेत अमेरिकन न्यायालयाने दिले आहेत. अमेरिकेच्या न्यायालयात भारताच्या वतीने अमेरिकन सरकार बाजू मांडत आहे.

भारतातील दहशतवादी प्रकरणांचा तपास करणाऱ्या एनआयएला मुंबई हल्ल्यातील राणाच्या भूमिकेची पुष्टी करायची आहे. त्याचा पाकिस्तानी वंशाचा मित्र डेव्हिड कोलमन हेडलीला त्याने किती प्रमाणात मदत केली हे एनआयएल जाणून घ्यायचे आहे. हेडलीचे लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी असलेले संबंध राणाला माहीत होते, हे अमेरिकन एजन्सींच्या तपासात सिद्ध झाले आहे. राणा हेडलीला दहशतवादी कारवायांबाबत सल्ला देत असे, असेही कळते.

हे ही वाचा:

गावातील लोकांमध्ये फूट पाडून राजकीय पक्षांनी आपली दुकाने चालवली

भूकंपाच्या धक्क्याने मेघालय हादरले

अश्लील रॅप गाण्याच्या चित्रीकरणाच्या विरोधात अभाविपची पुणे विद्यापीठात जोरदार निदर्शने

हिजाबपेक्षा शिक्षणाला महत्व देत कर्नाटकची तबस्सुम शेख पीयूसी परीक्षेत टॉपर

मुंबईवर झालेल्या हल्ल्यात भारतातील आणि परदेशातील १६० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.मुंबई हल्ल्यापूर्वी हेडलीने अनेक दिवस मुंबईत राहून तेथील अनेक ठिकाणांची पाहणी करून त्याचा अहवाल लष्कर-ए-तैयबाला दिला होता. त्या अहवालाच्या आधारे मुंबईतील दहशतवादी हल्ल्याची योजना आखून तो घडवून आणला.

अलीकडे अमेरिकेच्या न्यायालयाने राणाने मांडलेला स्टेटस कॉन्फरन्स प्रस्ताव फेटाळला होता.एनआयए २००८मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या २६/११ च्या हल्ल्यातील त्याच्या भूमिकेची चौकशी करत आहे. या हल्ल्यांमध्ये त्याच्या भूमिकेसाठी भारताने केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून त्याला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. जर प्रत्यार्पणाची विनंती भारताच्या बाजूने झाली तर एनआयए राजनयिक मार्गाने त्याला भारतात आणण्यासाठी कार्यवाही सुरू करेल. या संदर्भात२० मे पर्यंत या अंतिम निर्णय अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा